Trouble Sleeping at Night google
लाईफस्टाईल

Insomnia Relief: रात्री झोप येईना? 'या' ५ चुका टाळा मग येईल गाढ झोप

Sleep Tips: सध्याच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पुरेशी झोपही लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये वेळेवर बदल करणे गरजेचं आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. सध्या आळस खूप वाढत चालला आहे. लोक पुर्वीसारखं मेहनतीचं म्हणजेच जड काम करत नाहीत. तर कोणत्याही गोष्टीची सोपी ट्रिक शोधतात. पण त्यामुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे. त्याच्या परिणाम तुमच्या शरीरावर होतो. विशेष म्हणजे तुम्हाला झोपेसंदर्भात अनेक तक्रारी जाणवतात.

बऱ्याचदा आपण रात्री झोपायला गेलो की, मोबाईल पाहतो. तिथेच अनेकांचं चुकतं. तुमच्या याच सवयीमुळे तुमची झोप उडू शकते. अंथरूणावर पडूनही डोळ्यांना झोप लागत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी फक्त थकवा किंवा आळस म्हणून जाणवतो असं अनेकांना वाटतं. पण याचा थेट संबंध तुमच्या शरीराच्या आरोग्यावर होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दिवसभरात करणाऱ्या चुकांमुळे तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. तुम्हाला यासाठी कोणतेही जास्तीचे कष्ट करायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या ठरलेल्या वेळेत झोपणं गरजेचं आहे. सुट्टीच्या दिवशीही वेळ बदलणं टाळा. याने तुम्हाला पुन्हा सवय लावणं कठीण होऊन जातं.

तुम्ही जर वेळेवर झोपलात आणि वेळेवर उठलात तर तुमच्या हार्टवर कोणताच वाईट परिणाम होत नाही. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी झोपताय तिथे स्वच्छता, शांतता आणि अंधार आहे का? हे तपासा. अशा वातावरणात मेंदूला आरामाचा संदेश मिळत नाही.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही झोपताना चहा, कॉफी किंवा कॅफिनयुक्त ड्रिंक्स घेणं टाळा. त्याने तुम्हाला फ्रेश वाटतं आणि झोप उडते. तर दिवसातून किमान ३० मिनिटे चाला किंवा व्यायाम करा. त्याने शरीर थकतं आणि तुम्हाला झोप लागते. तसेच सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहा. झोपताना चुकीच्या सवयी टाळा. म्हणजे टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे, लॅपटॉपचा वापर करणे अशा सवयी त्या-त्या वेळेतच पूर्ण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KBC 18: 'ट्रेनिंगमध्ये साप खावे लागतात...'; CRPF कमांडेंटचा बिग बॉसमध्ये मोठा खुलासा

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT