Jio New Year Recharge Dhamka Saam Tv
लाईफस्टाईल

New Year ला Jio चा धमाका! एका रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग्सह मिळणार 900 GB डेटा, युजर्सची होणार मज्जा

Jio New Year Recharge Dhamka : रिलायन्स जिओने नुकताच नवा प्लान ऑफर केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, एसएमएस आणि डेटा पॅक मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना एकदाच रिचार्ज करण्याची गरज पडणार आहे. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला कशी सेवा मिळेल जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Jio New Year Recharge Offer :

जिओ टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची धमाल ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरमुळे अनेक टेलिकॉम कंपनीची बत्ती गुल होणार आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते.

रिलायन्स जिओने (Jio) नुकताच नवा प्लान ऑफर केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स (Calls) , एसएमएस आणि डेटा पॅक मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना एकदाच रिचार्ज करण्याची गरज पडणार आहे. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला कशी सेवा मिळेल जाणून घेऊया.

जिओचे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन्ही प्लान आहेत. यामधला लाँग प्लान हा थोडा महाग वाटू शकतो. परंतु, यामध्ये ग्राहकांना अधिक फायदे (benefits) होणार आहे. तसेच यामध्ये ग्राहक आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट म्हणून २४ दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडीटी देणार आहे.

जिओच्या या ऑफरमध्ये वर्षभराची वैधता मिळणार आहे. जिओचा हा प्लान २९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान असल्यामुळे ३६५ दिवस वैधतेसह मिळणार आहे. कंपनीच्या अंतर्गत २४ दिवसांची वैधता देखील मिळणार आहे. याचा अर्थ असा की, ३६५ +२४ दिवसांची वैधता यामध्ये मिळेल. या डेटा ऑफरमध्ये तुम्हाला 912.5GB ऑफर केला जात आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला २४ दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळणार आहे.

या प्लानमध्ये तुम्हाला दिवसाला २.५ जीबी जेटा दिला जाईल. २९९९ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेसह एसएमएसची सुविधाही फ्री दिली जाणार आहे.

जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला JioTv, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. या रिचार्जमुळे तुम्हाला दरमहिन्याला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. तसेच अधिक खर्च होणारे पैसे देखील वाचतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT