New Year Flight Booking In Budget Saam tv
लाईफस्टाईल

New Year ची धमाकेदार ऑफर! 1924 रुपयांमध्ये मिळणार Flight Ticket, बुकिंग प्रोसेस पाहा

New Year Flight Booking In Budget : डिसेंबर महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात ते ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे. या काळात सुट्ट्यामध्ये फिरण्यासाठी अनेकजण बाहेर जाण्याचा प्लान करत असतात. परंतु, जर ही ट्रिप बजेटमध्ये व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठीच विस्तरा एअरलाइन्सने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे.

कोमल दामुद्रे

Christmas Sale Offer :

नवीन वर्षात जर तुम्ही देखील कुठे फिरण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. हिवाळा म्हटलं की, अनेकांचा बाहेर जाण्याचा प्लान असतो. डिसेंबर महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात ते ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे.

या काळात सुट्ट्यामध्ये फिरण्यासाठी अनेकजण बाहेर जाण्याचा प्लान करत असतात. परंतु, जर ही ट्रिप बजेटमध्ये व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठीच विस्तरा एअरलाइन्सने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे.

टाटा ग्रुप एअरलाइन्स विस्ताराच्या ख्रिसमस सेलमध्ये तुम्हाला विस्तारा फ्लाइट्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. विस्ताराच्या या ऑफरमध्ये प्रवाशांना केवळ १९२४ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. ही ऑफर काही काळापर्यंतच आहे.

विस्तारा एअरलाइन्सने सोशल मीडियावर म्हटले की, एअरलाइनच्या विंटर सेलमध्ये १९२४ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येईल. ही ऑफर एअरलाइन्सच्या इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी लागू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रवासी २१ डिसेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत फ्लाइट (Flight) तिकीट बुक करु शकतात.

1. फ्लाइट तिकीट 1924 रुपयांना मिळेल

विस्ताराच्या फेस्टिव्हल सेलमध्ये प्रवाशांना इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास या तिन्ही फ्लाइटवर ऑफर मिळत आहे. देशांतर्गत प्रवाशांसाठी इकॉनॉमी क्लासची किमत १९२४ रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लासची किमत (Price) २३२४ रुपये तर बिझनेस क्लासची किमत ९९२४ रुपये इतकी आहे.

अशातच ही ऑफर विस्ताराच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर देखील उपलब्ध आहे. प्रवाशांना इकॉनॉमी क्लास (दिल्ली-ढाका)10,999 रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लास (दिल्ली-काठमांडू) 14,999 रुपये आणि बिझनेस क्लास (दिल्ली-ढाका) 29,999 रुपये पासून बुक करता येईल.

2. बुकिंग कसे कराल?

विस्तारा एअरलाइन्सच्या अधिकृत वेबसाइटनुसार प्रवाशांसाठी ही नवीन वर्षाची ऑफर 21 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होईल, ज्यामध्ये तुम्ही 21 डिसेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फ्लाइट तिकीट बुक करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT