Newly Wed Bride saam tv
लाईफस्टाईल

Newly Wed Bride: सासरी पाऊल ठेवताच नव्या सूनेकडून कधीच ठेऊ नयेत 'या' अपेक्षा; घरात होऊ शकतो मोठा कलह

Newly Wed Bride: ज्यावेळी घरी नवी सून येतो, तेव्हा तिच्याकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत की, ज्यावेळी एखादी नवी मुलगी सून म्हणून घरी येते, त्यावेळी तिच्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करू नये.

Surabhi Jayashree Jagdish

लग्न म्हटलं की, नव्या नवरीच्या चिंता भरपूर असतात. नवी लोकं कशी असतील, त्यांचे स्वभाव कसे असतील, नवी ठिकाणी एडजस्ट करता येईल ना? असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात असतात. ज्यावेळी घरी नवी सून येतो, तेव्हा तिच्याकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. मात्र बऱ्याचदा असं होतं की, या अपेक्षा इतक्या जास्त असतात की, त्यामुळे ताण आणि कलह वाढू शकतो.

आज या आर्टिकलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, ज्यावेळी एखादी नवी मुलगी सून म्हणून घरी येते, त्यावेळी तिच्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करू नये. जर नव्या मुलींवर जास्त प्रमाणात जबाबदाऱ्या दिल्या तर ती दुखावली जाण्याची शक्यता असते. जाणून घेऊया अशावेळी कोणत्या गोष्टींची अपेक्षा नवीन सूनेकडून करू नये.

लगेच सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची अपेक्षा

कोणत्याही ठिकाणी आपल्याला रूळायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे नव्या सूनेला देखील घरामध्ये एडजस्ट होण्यास वेळ लागतो. तिला घरातील सर्व गोष्टी समजण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे तिला तो वेळ दिला पाहिजे.

प्रत्येक नात्याला लगेच समजण्याची अपेक्षा

सून ही त्या परिवारात नवी असते, त्यामुळे तिथली लोकं देखील तिच्यासाठी नवी असतात. त्यामुळे त्या व्यक्तींसोबत असलेली नाती आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी तिला वेळ लागू शकतो.

परफेक्ट सून बनण्याची अपेक्षा

प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असते, प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण असते असं नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरी आलेल्या मुलीवर परफेक्ट सून बनण्याची अपेक्षा ठेऊ नये. ज्यावेळी तिच्यावर अपेक्षांचं ओझं असतं तेव्हा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिला तिचा वेळ देणं योग्य ठरेल.

परंपरांचं पालन करण्याची इच्छा

प्रत्येकाची संस्कृती आणि परंपरा या वेगळ्या असतात. त्यामुळे घरी आलेल्या मुलीकडून लगेच घरातील परंपरा आणि संस्कृती जोपासण्याची घाई करू नये. काळानुसार, ती या सर्व गोष्टी शिकू शकते

सर्वांना खूश ठेवण्याची अपेक्षा

सूनेने घरातील प्रत्येक व्यक्तीला खूश ठेवावं असी घरच्या लोकांची इच्छा असते. मात्र घरातील वातावरण सुखी आणि खूश ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असते. त्यामुळे केवळ सूनेने नव्हे तर यामध्ये सर्वांनी मोलाचा वाटा उचलला पाहिजे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT