Neck pain And Headache Symptoms Tips  saam tv
लाईफस्टाईल

Health Tips : मानेचं दुखणं हे तीव्र डोकेदुखीचं कारण असू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं, असं का होतंय?

Neck Pain And Headache Symptoms Tips : मानदुखी आणि डोकेदुखीचा त्रास अनेकांना होतो. चुकीची बसण्याची पद्धत, मोबाईलचा जास्त वापर, सर्व्हिकल समस्या आणि मायग्रेन यामुळे हा त्रास वाढू शकतो. यामागील कारणे आणि लक्षणे जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • मानदुखी आणि डोकेदुखी एकमेकांशी संबंधित असू शकतात.

  • चुकीची बसण्याची पद्धत आणि मोबाईलचा जास्त वापर यामुळे मानदुखी वाढते

  • मायग्रेन आणि TMJ डिसऑर्डरमुळेही डोकेदुखी होऊ शकते

  • सर्व्हिकल नर्व्ह समस्येमुळे सर्व्हिको-जेनिक डोकेदुखी निर्माण होऊ शकते

  • लक्षणे वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक

Neck Pain And Headache Causes And Symptoms मानदुखी ही खूपच त्रासदायक असल्याने दैनंदिन कामांवरती त्याचा भयंकर परिणाम होतो. काही वेळा मानेशी संबंधित समस्या डोकेदुखीला कारणीभूत ठरतात, तर काहीवेळा डोकेदुखीमुळे मानदुखी होते. मानदुखी व डोकेदुखी यामागे अनेक कारणे असू शकतात. मानदुखीशी संबंधित डोकेदुखी सामान्यतः दीर्घकालीन स्वरूपाची असते. सर्व्हिकल नर्व्ह आणि मानेशी संबंधित समस्यामुळे सर्व्हिको-जेनिक डोकेदुखी निर्माण होऊ शकते. यामुळे मानदुखी, अकडलेपणा, मळमळ, दृष्टी धूसर होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

मानदुखीची कारणे

  • चुकीच्या आणि अवघडलेल्या शारीरिक स्थितीत सतत राहणे

  • टेबलवर बसून दीर्घकाळ काम करणे

  • मानेच्या स्नायूंमध्ये अकडलेपणा

  • मानेच्या दुखापती

  • मोबाईलचा वारंवार वापर

  • झोपेच्या अयोग्य स्थिती

  • मानेतील चिमटलेली नस

मानदुखीला कारणीभूत असणारे डोकेदुखीचे प्रकार

  • मायग्रेन

मायग्रेन ही पुन्हा-पुन्हा होणारी डोकेदुखी आहे, ज्यात डोक्याच्या एका बाजूला मध्यम ते तीव्र वेदना होतात. मानसिक ताण, हार्मोन्समधील बदल, हवामानातील बदल, वारंवार उपाशी राहणे इत्यादी लक्षण मायग्रेनला कारणीभूत घटक ठरतात.

  • टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट (TMJ) डिसऑर्डर्स:

TMJ डोकेदुखी ही कानाजवळ सुरू होणारी सौम्य वेदना असते आणि ती कानदुखीसारखी वाटू शकते. त्यानंतर त्याचा प्रभाव वाढून डोकेदुखी निर्माण होते. आनुवंशिकता, स्नायू किंवा लिगामेंट्सची झीज, स्नायूंचा थकवा किंवा कमकुवतपणा, जबड्याचा संधिवात इत्यादी लक्षण टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट डिसऑर्डर्सला कारणीभूत घटक ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Lek Ladki Yojana: राज्य सरकारची योजना! लेक १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १ लाख १ हजार रुपये

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

SCROLL FOR NEXT