Navratri Special Recipe 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Special Recipe 2022 : यंदाच्या नवरात्रीत चव चाखा 'उपावासाच्या शंकरपाळीची', महिनाभर टिकेल !

अशा प्रकारे बनवा ग्लुटेन फ्री शंकरपाळी

कोमल दामुद्रे

Navratri Special Recipe 2022 : शारदीय नवरात्री अवघ्या काही दिवसात येत आहे. ही नवरात्री दुर्गा देवीला समर्पित असून या दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा ही नवरात्री २६ सप्टेंबरपासून सुरु होत आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीचे भक्त तिची मनोभावे पूजा व अर्चना करतात. तिचा नऊ दिवस उपवास देखील करतात. या काळात बरेच लोक अन्न व पाणीविरहीत उपवास करतात. या काळात काही लोक फक्त दिवसातून एकदाच खातात. त्यामुळे त्यांना अपचनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यासाठी जाणून घेऊया पोट भरलेले राहिल व अपचनाचा त्रास होणार नाही अशी उपवासाची शंकरपाळी.

साहित्य -

२ कप चाळलेले - राजगिरा पीठ

१ १/२ कप - दूध (Milk)

अर्धा कप - पिठी साखर

२ चमचे - तूप

मीठ - चिमूटभर

तेल (Oil) - आवश्यकतेनुसार

कृती -

- सर्वप्रथम आपण राजगिऱ्याचे पीठ चाळून घ्या. त्यानंतर थंड दूधात अर्धा कप पिठी साखर विरघळ्यासाठी दूध कोमट गरम करुन घ्या.

- फोडणीच्या भांड्यात २ चमचे तूप घेऊन गरम करुन घ्या.

- राजगिऱ्या पिठात तयार केलेले तूपाचे मोहन घाला. त्यात चिमूटभर मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करा.

- तयार मिश्रणात दूध व पिठसाखरेचे तयार केलेले मिश्रण हळूहळू घाला व पीछ चांगले मळून घ्या. त्यानंतर तयार कणीक अर्धातास ठेवा. शंकरपाळी करताना कणीक तयार करतो अगदी तसेच करावे.

- कणकेचे गोळा तयार करुन घ्या. लाटण्याला तूप लावून जाडसर चपातीसारखे लाटून घ्या. शंकरपाळ्याचा आकार देऊन मंद आचेवर तळून घ्या. लालसर झाले की, काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT