Navratri Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri : नवरात्रीत कंडोमची होतेय सर्वात जास्त विक्री, कारणे आली समोर

या दिवसात धार्मिक कार्याला महत्त्व दिले जाते. तसेच कोणत्याही वाईट गोष्टीपासून व वासनेपासून लांब राहावे असे देखील सांगितले जाते.

कोमल दामुद्रे

Navratri : नवरात्रीच्या (Navratri) नऊ दिवसाचा हा सण अगदी आनंदात साजरा केला जातो. या दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. दुर्गा देवीला मनोभावे पूजुन तिची अर्चना केली जाते.

या दिवसात धार्मिक कार्याला महत्त्व दिले जाते. तसेच कोणत्याही वाईट गोष्टीपासून व वासनेपासून लांब राहावे असे देखील सांगितले जाते. परंतु, एका सर्वेक्षणानुसार नवरात्रीत कंडोमची मागणी सर्वाधिक केली जात आहे असे दिसून आले. हे धक्कादायक असले तरी सर्वेक्षणातून समजून आले आहे.

या काळात गरबा (Garba), कोरिओग्राफर व सेलिब्रेटीज यांना अधिक पसंती दिली जाते परंतु, कंडोमला तितकेच प्राधान्य दिले जात आहे. तसेच या काळात कंडोमच नाही तर गर्भनिरोधक गोळ्या व प्रायव्हेट डिटेक्टिव्ह चाचणी यांची देखील मागणी वाढत आहे.

बरेचदा चित्रपटात हिरो-हिरोईनमध्ये शारीरिक संबंध असणारे सीन गरब्याच्या माध्यमातून दाखवले जातात. याचा तरुण मनावर विशेषता किशोरवयीन असणाऱ्या मुलांवर अधिकतर परिणाम होताना दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात येणारी उष्णता व गुलाबी थंडीच्या चाहूलीमुळे तरुण वयातील मुलांना अधिक आकर्षण निर्माण होते. या अल्हादायक गोष्टीकडे तरुण जोडप्यांचे मन अधिक रमते व कॅज्युअल सेक्सकडे वळतात. या काळात होणारे हार्मोनल बदलामुळे व गरबा खेळणाऱ्या जोडीदाराकडे अधिक मन वळले जाते असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

सध्या तरुण पिढी शरीरसंबंध ठेवण्यात कचरत नाही परंतु, येणाऱ्या समस्येना तोंड देताना नाकी नऊ येण्याची पाळी येते. त्यामुळे गरबा खेळायला जाताना मनाला व शरीराला नियंत्रणात ठेवा आणि गरबा अधिक आनंदात खेळा .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT