Narali Purnima 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Narali Purnima 2023 : सण आयलाय गो नारळी पुनंवचा! नारळी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या सणाबद्दलच्या खास गोष्टी

Narali Purnima 2023 History : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. नारळी पौर्णिमेच्या सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते.

कोमल दामुद्रे

Narali Purnima 2023 Date : श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सणांची सुरुवात होते. नागपंचमीनंतर येणारा दुसरा सण अर्थात नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. नारळी पौर्णिमेच्या सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते.

यंदा नारळी पौर्णिमा ही ३० ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. नारळी पौर्णिमा हा सण रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा केला जातो. भद्राचं सावट असल्यामुळे रक्षाबंधन ही ३१ ऑगस्टला साजरी केली जाईल. या दिवशी कोळी बांधव समुद्राची मनोभावे व विधीवत पूजा करतात. हा सण अगदी धूमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करुन नारळ अर्पण करतात. या दिवसानंतर वाऱ्याचा जोर व दिशा बदलण्यासाठी कोळी बांधव समुद्र देवतेला आवाहन करतात.

1. नारळी पौर्णिमेचे महत्त्व

नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्र व त्या लगत असणाऱ्या कोकणी प्रदेशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोळी बांधव दर्या राजाला शांत करण्यासाठी हा सण साजरा करतात. पावसाळ्यात समुद्राला (Sea) भरती आल्यामुळे व कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्राची पूजा करुन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मच्छीमार पाण्यात (Water) सुरळीत प्रवासासाठी (Travel) समुद्र-देव वरुणाची पूजा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्र ठिकाणी नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करतात.

2. पूजा पद्धत

नारळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराचीही पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, नारळ हा भगवान शिवाला अंत्यत प्रिय असल्यामुळे तो अर्पण केला जातो. दक्षिण भारतात या दिवशी उपनयन किंवा यज्ञ विधी मोठ्या प्रमाणावर केले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: पंढरपूर माळशिरस तालुक्याला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT