Narak Chaturdashi 2023 Saam TV
लाईफस्टाईल

Narak Chaturdashi 2023 : नरक चतुर्दशी कधी आहे? शुभ वेळ, तिथी आणि पूजा मुहूर्त जाणून घ्या

Narak Chaturdashi 2023 Shubh Muhurat : नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त कधी आहे? तिथी आणि पूजा मुहूर्त कधी? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Narak Chaturdashi 2023 Date :

दिवाळी म्हटंल की, आपल्याला सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात रांगोळीचे रंग, आतेषबाजी, कंदील आणि फराळाच्या गोडव्याची चव चाखायला मिळते.

हिंदू पंचागानुसार दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा ही चतुर्दशी १२ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, काली माता आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हा सण (Festival) साजरा केला जातो. यंदा नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त कधी आहे? तिथी आणि पूजा मुहूर्त कधी? जाणून घ्या

1. नरक चतुर्दशी कधी आहे?

नरक चतुर्दशी ही १२ नोव्हेंबरला रविवारी साजरी केली जाणार आहे. यंदा नरक चतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त देखील आहे. हे दोन्ही दिवस एकाच दिवशी आले आहेत.

2. नरक चतुर्दशी तिथी आणि शुभ मुहूर्त

नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त हा ११ नोव्हेंबरला शनिवारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सुरु होईल तर समाप्ती १२ नोव्हेंबरला दुपारी ०२ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार या दिवस १२ नोव्हेंबरला साजरा (Celebrate) केला जाईल.

नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे. या काळात तुम्ही पूजा करु शकता.

3. नरक चतुर्दशी पूजा विधी

  • नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज, काली माता, भगवान शिव, हनुमान यांची आराधना केली जाते.

  • भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT