Monday Astrological Remedies saam tv
लाईफस्टाईल

Somwar che Upay: समस्या दूर होऊन घरी येणार पैसा; सोमवारच्या दिवशी शंकराच्या आशिर्वादासाठी करा 'हे' उपाय

Monday Astrological Remedies: धार्मिक मान्यतांनुसार, सोमवारी भगवान शिव यांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं. यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते. त्याचप्रमाणे तुम्हाला करियरमध्येही चांगलं यश मिळतं.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या हिंदू धर्मामध्ये आठवड्याचा प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला असतो. आज सोमवार असून हा दिवस भगवान शिवाला समर्पित असल्याचं मानलं जातं. या दिवशी खास महादेवाची पूजा केली जाते. यामुळे व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. त्याचप्रमाणे त्याला सुख-समृद्धी मिळू शकते.

आजच्या दिवशी भगवान शिव यांच्या मंदिरत जाऊन शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र चढवलं पाहिजे. असं केल्याने त्याच्या भक्तांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. ज्योतिष्य शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे सोमवारी करावेत. आजच्या दिवशी हे उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. याशिवाय मनाला शांती देखील प्राप्त होते.

शिवलिंगाची पूजा करा

सोमवारच्या दिवशी घरातील उत्तर-पूर्व दिशेला स्वच्छ करून त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन करा. यानंतर गंगजलने शिवालिंगाचा अभिषेक करा. ज्योतिष्य शास्त्रामध्ये उत्तर-पूर्व दिशेमध्ये अध्यात्मिक ऊर्जेला जोडण्यात आलंय. त्यामुळे शंकराची उपासना शुभ मानली जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारण्यास मदत होते.

बेलपत्र वाहावं

भगवान शंकरांना बेलपत्र खूप प्रिय होतं. याच कारणाने सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र चढवल्याने चांगले आणि शुभ परिणाम मिळण्यास मदत होते. बेलपत्र केवळ धार्मिक दृष्टीने नाही तर वास्तूच्या हिशोबाने देखील महत्त्वपूर्ण मानलं जातं.

दूध-पाण्याने अभिषेक करा

सोमवारच्या दिवशी घरातील मंदिरात स्थापित असलेल्या शिवलिंगाचा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. वास्तूच्या हिशोबाने असं केल्याने तुम्हाला मानसिक शांती प्राप्त होते. मात्र या दिवशी चुकूनही उत्तर-पूर्व दिशा अस्वच्छ राहणार नाही याची काळजी घ्यावी. असं केल्याने मानसिक तणाव वाढू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT