Moderna Merck Intismeran cancer vaccine latest news saam tv
लाईफस्टाईल

कॅन्सरवर इलाज मिळाला, मॉडर्ना-मर्कची कॅन्सरवर नवीन लस

New Cancer Vaccine Gives Hope: कॅन्सरवर आता लस आलीय. या लशीची तिसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी झालीय. कोणत्या देशात या लशीचा शोध लागलाय? या लशीमुळे नेमकं काय होणार आहे? पाहूयात हा रिपोर्ट......

Rohit Kadam

ल्या अनेक दशकांपासून कॅन्सरसारखा दुर्धर आजार वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठं आव्हान राहिलाय. देशात कॅन्सरमुळे अनेकांना पुरेशा उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागतो. देशभरात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिलासादायक बाब समोर आलीये. मॉडर्ना आणि मर्कनं विकसित केलेल्या MRNA लसीमुळे प्रत्येक रुग्णाला आता कॅन्सरवर मात करता येणार आहे. कारण या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात मोठं यश मिळालंय. कॅन्सरवर मात करणाऱ्या लशीची काय वैशिष्ट्ये आहेत ते पाहूयात....

लस कॅन्सर रुग्णाच्या ट्युमरच्या जेनेटिक माहिती आधारे तयार करतात

मेलेनोमा म्हणजे त्वचेच्या कॅन्सर असलेल्या 1137 रुग्णांवर यशस्वी चाचणी

रोग-प्रतिकारक पेशींना कॅन्सरच्या पेशींची ओळख पटवणं हा लशीचा उद्देश

ऑपरेशननंतर उरलेल्या एकदम छोट्या कॅन्सर पेशींना टार्गेट करते

INTISMERAN लशीच्या मेलेनोमा म्हणजेच त्वचेच्या कॅन्सर असलेल्या रुग्णांवर केलेल्या चाचणीला मोठं यश मिळालंय. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, ही सकारात्मक बाब असली तरी यासंदर्भात कॅन्सर तज्ज्ञांनी काय म्हटलंय पाहूयात..

लशीसंदर्भात अधिक अभ्यास सुरू असला तरी कॅन्सरवरील ही लस नेमकी कशी काम करणार आहे तेही पाहूयात...

कॅन्सरची नवीन लस कशी काम करते?

सुरुवातीला रुग्णाची कॅन्सरची गाठ ऑपरेशनद्वारे बाहेर काढली जाते

गाठीतील जनुकीय बदलांचा (म्यूटेशन) अभ्यास केला जातो

प्रतिकारशक्तीला ओळखता येतील असे विशिष्ट टार्गेट शोधले जातात

प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरनुसार खास MRNA लस तयार केली जाते

ही लस शरीराच्या इम्युन सिस्टमला कॅन्सर पेशी नष्ट करण्याचं ट्रेनिंग देते

लस दिल्यावर, कर्करोग पुन्हा बळावण्याचा आणि शरीराच्या इतर भागांत पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं सिद्ध झालंय. कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपीचे अनेक दुष्परिणाम रुग्णांना सहन करावे लागतात. मात्र, या लशीमुळे लाखो कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT