Milk Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Milk Benefits : रात्री झोपण्यापूर्वी दूधात मिसळा हा पदार्थ; मधुमेह, हृदयविकाराच्या धोक्यापासून करेल संरक्षण

Milk Benefits For Health : दूध प्यायल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे शरीरात एनर्जी येते.

कोमल दामुद्रे

Heart Care Tips :

रात्री झोपण्यापूर्वी अनेकांना दूध प्यायची सवय असते. थंड दूध प्यायल्याने अॅसिडिटी दूर होते. रात्री दूध प्यायल्याने शांत आणि गाढ झोप लागते. तसेच सर्दी खोकला झाल्यावर हळदीचे दूध परिणामकारक असते. हळदीसोबतच तूम्ही सुका मेवा घालून दूध प्यायलात तर शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल.

अनेक लोक लहान मुलांना झोपण्याआधी दूध देतात. कोणताही आजार जडू नये. त्यांची झोप व्यवस्थित पूर्ण व्हावी यासाठी दूध फायदेशीर ठरते. दूध प्यायल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे शरीरात एनर्जी येते. याच दूधात तुम्ही काजूची पावडर घालून प्यायलात तर अनेक आजार दूर पळतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काजू हा सर्वांनाच आवडत असतो. काजू खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, प्रोटीन असे घटक असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून (Disease) आपले संरक्षण होते.

1. हृदयासाठी महत्त्वपूर्ण

काजू पावडर घातलेले दूध शरीरासाठी फायदेशीर असते. यात मोनो अनसॅच्युरेटेड अॅसिडड असते. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हृदयाचे (Heart) कार्य सुरळीत होचे. त्यामुळे हृदयाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.

2. हाडे मजबूत होतात

काजू पावडर घातलेले दूध प्यायल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतात. त्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे घटक असतात. त्यामुळे हाडांना (Bones) खूप फायदा होतो. हाडे मजबूत होण्यापासून मदत होते.

3. प्रतिकारशक्ती

दूध प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात. त्यात काजू पावडर घातलेले दूध असेल तर शरीराला दुप्पट फायदा होतो. काजूच्या दूधामुळे प्रतिकाररशक्ती वाढते. कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती तयार होते.

4. साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

काजू पावडरचे दूध प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाचा धोका टळतो. त्यातील अॅसिड शुगर लेव्हल मेंटेन करण्यासाठी मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT