What foods should you avoid to prevent migraine
What foods should you avoid to prevent migraine ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मायग्रेनच्या रुग्णांनी हे पदार्थ खाणे टाळा, अन्यथा होईल आरोग्यावर परिणाम

कोमल दामुद्रे

मुंबई : सध्या मायग्रेन हा आजार जगभरात सर्वसामान्य आजारांच्या यादीत आहे. अनेक लोक या आजारांशी झुंज देण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे देखील पहा -

भयंकर डोकेदुखी सुरू झाली आणि आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असल्यास तो जवळ जवळ ७२ तासांपर्यंत सुरू राहू शकतो. मायग्रेनचा त्रास हा डोक्यात असणाऱ्या रक्तवाहिन्यांपासून सुरू होतो. याचे मुख्य कारणे हे अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व व्यस्त जीवनशैलीमुळे होऊ शकतो. मायग्रेन असणाऱ्या रुग्णांना डोकेदुखी, उलटी, मळमळ, प्रकाश व ध्वनीबाबत संवेदनशीलता अशा समस्यांना (Problems) सतत सामोरे जावे लागते. आपल्याला मायग्रेनचा त्रास असेल तर सामान्यपणे आपण काही पदार्थ खाण्यास टाळायला हवे नाहीतर त्याचा त्रास आपल्याला अधिक जाणवू शकतो. अधिक मिठाचे सेवन केल्यास मायग्रेनच्या वेदना वाढू शकतात. सतत चॉकलेट-चीज खाणे देखील चांगले नसते. मायग्रेनचा त्रास वाढू नये यासाठी आपण कोणते पदार्थ (Food) टाळायला हवे हे जाणून घेऊया.

१. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यास रक्तदाबात वाढ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जी मायग्रेनच्या वेदनांना जबाबदार असू शकते.

२. कॅफीनयुक्त पेयांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास मायग्रेनच्या वेदना वाढू लागतात. दिवसात २०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफीनचे सेवन केल्यास डोक्यातील वेदना असह्य होऊ शकतात.

३. बऱ्याच जणांना मद्यपान करण्याची सवय असते. विशेषत: रेडवाइनमध्ये असलेले सल्फाइट व टॅनिन मायग्रेन पीडितांसाठी घातक असते. मद्यसेवन हे मायग्रेन असणाऱ्यासाठी अधिक घातक ठरु शकते.

४. अजीनोमोटोचे सेवन आपल्या शरीरात अधिक झाल्यास मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. अजीनोमोटोचे प्रमाण शरीरात वाढल्यास मेंदूत ऑक्सिजनचा प्रवाह जलद गतीने होतो त्यामुळे डोकेदुखी वाढू लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Live Breaking News: धाराशिवमध्ये ५५.४६ टक्के मतदान : कांही केंद्रांवर सांयकाळी सात नंतरही मतदान सुरू

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

SCROLL FOR NEXT