Metro Tickets Book On WhatsApp
Metro Tickets Book On WhatsApp  Saam Tv
लाईफस्टाईल

Book Metro Tickets On WhatsApp: फक्त एका क्लिकवर मिळणार मेट्रोचे तिकीट ! WhatsApp वरुन स्टेप-बाय-स्टेप करा बुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Metro Ticket Booking: तुम्हाला मेट्रो स्टेशनबाहेरची लांबलचक रांग टाळायची असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. दैनंदिन मेट्रोने प्रवास करून, तुम्ही रहदारी, उष्णता आणि लांबचा प्रवास झटपट कुठेही पोहोचू शकता.

मेट्रोने प्रत्येकासाठी प्रवास सोपा केला आहे. पण अनेक वेळा मेट्रोची लांबलचक रांग सर्वांनाच त्रास देते, अगदी मेट्रोचे (Metro) तिकीट काढायचे असले तरी. मात्र आता लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. चेन्नई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आता युजर्सला व्हॉट्सअॅपवर ट्रेनचे तिकीट बुक करण्याची परवानगी देणार आहे.

व्हॉट्सअॅपद्वारे मेट्रोचे तिकीट -

CMRL ने Tanla Solutions ची उपकंपनी असलेल्या Carrix च्या सहकार्याने WhatsApp चॅटबॉट-आधारित QR तिकीट सेवा सुरू केली आहे. चेन्नईतील लोकांचा दैनंदिन प्रवास सुलभ आणि सोयीस्कर व्हावा हा या सेवेचा उद्देश आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या मदतीने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही.

त्याऐवजी, ते काही मिनिटांत तिकीट (Ticket) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांचे व्हॉट्सअॅप ऍप्लिकेशन वापरू शकतात. चॅटबॉट वापरकर्त्यासाठी अनुकूल इंटरफेस प्रदान करतो ज्यामध्ये प्रवासी इंग्रजी आणि तमिळ दोन्ही भाषांमध्ये चॅट करू शकतात.

WhatsApp द्वारे तिकीट बुक करण्यासाठी प्रक्रियेचे अनुसरण करा

  • यासाठी सर्वप्रथम +91 83000 86000 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा.

  • यानंतर व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) या नंबरवर हायचा मेसेज पाठवा.

  • यासाठी क्यूआर कोडही स्कॅन करता येतो. एकदा कनेक्ट झाल्यानंतर, तुम्हाला चॅटबॉटद्वारे ऑफर केलेल्या विविध सेवांचा पर्याय मिळेल.

  • यामध्ये तिकीट बुक करणे, भाडे आणि मार्ग तपशील तपासणे, प्रारंभ आणि गंतव्य स्थाने निवडणे समाविष्ट आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात सुरुवात करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT