Mental Health Saam TV
लाईफस्टाईल

Mental Health News : स्नॅक्समधील हे पदार्थ खाताच मेंटल हेल्थ होते खराब; वाचा यादी

Snacks Bad For Human Brain : स्नॅक्समध्ये काही ठरावीक पदार्थ खाणे टाळलं पाहिजे. कारण याचा थेट परिणाम आपल्या मेंटल हेल्थवर होत असतो. त्याच पदार्थांची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात डोकं आणि मेंदू सर्वात महत्वाचा घटक आहे. व्यक्ती मेंदूच्या मदतीने विचार करतो आणि आपले निर्णय घेत असतो. निरोगी आरोग्यासाठी मेंटल हेल्थ सुद्धा महत्वाची असते. जर मेंदूवर ताण आला तर त्याने आपली चिडचिड वाढते आणि अनेक अडचणी येतात. मात्र तुम्हाला माहितीये का? मेंटल हेल्थ फक्त टेन्शनमुळे नाही तर आपल्या आहारात असलेल्या पदार्थांमुळे सुद्धा खराब होते.

सध्या प्रत्येकाला फास्ट फूड खावं असं वाटतं. फास्ट फूड खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा हळूहळू परिणाम दिसू लागतो. याने फक्त आरोग्य नाही तर मेंटल हेल्थ सुद्धा खराब होते. त्यामुळे आज या बातमीमधून स्नॅक्समध्ये तुम्ही कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणते पदार्थ अजिबात खाल्ले नाही पाहिजे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

बटाट वेफर्स

बटाटा वेफर्समध्ये जास्त करून अनहेल्दी ट्रांस फॅट आणि सॅचुरेटेड फॅट असतं. यामुळे शरीरात आणि मस्तिष्कामध्ये सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे असे वेफर्स सतत खाणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो.

बेक्ड प्रोडक्ट

कुकीज, बिस्कीट्स असे सर्वच बेक्ड प्रोडक्टमध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असते. याने हृदय आणि मेंदूला थेट इजा होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर ज्या व्यक्ती दररोज या पदार्थांचे सेवन करतात त्यांना हार्ट स्ट्रोक देखील होण्याची शक्यता असते.

डीप फ्राय

भजी, चिकन, मासे, समोसे, अंडी असे विविध पदार्थ अगदी डीप फ्राय केले जातात. तेलात डीप फ्राय केल्याने हे पदार्थ अगदी चविष्ट लागतात. मात्र अशा पदार्थांमुळे आपल्या मेंदूतील नसांना सूज येते. नसांना सूज आल्याने डोकं काम करणं बंद होतं. मेंदूपर्यंत योग्य आणि मुबलक प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही.

तसेच अशा पद्धतीने तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल आणखी जास्त वाढते आणि रक्त वाहिन्यांमध्ये फॅट जमा होते. याने ब्रेन स्ट्रोक होण्याची सुद्धा शक्यता आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT