Maruti Suzuki Electric Car Twitter / @Maruti_Corp
लाईफस्टाईल

Maruti Suzuki Electric Car : मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार आली; 550 KM रेंज, पाहा फीचर्स

देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे.

कोमल दामुद्रे

Maruti Suzuki Electric Car : ऑटो एक्सपो 2023 सुरू झाला असून देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. मारुती सुझुकीने आपली इलेक्ट्रिक SUV eVX ही संकल्पना प्रदर्शित केली.

ईव्हीएक्स ही सुझुकीने डिझाइन केलेली आणि विकसित केलेली मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. या संकल्पनेतील इलेक्ट्रिक SUV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो पूर्ण चार्ज झाल्यावर 550 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.

ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार (Car) आहे. कंपनीकडे (Company) सध्या लाइनअपमध्ये कोणतेही इलेक्ट्रिक वाहन नाही. EVX मॉडेल 2025 मध्ये लॉन्च केले जाईल.

1. फीचर्स :

  • मारुती बलेनोवर आधारित, याला कर्व्ही एक्सटीरियर्स मिळतात.

  • त्यात एसयूव्हीचे डिझाइन दिसत आहे. हे एरोडायनामिक सिल्हूट, लांब व्हीलबेस, लहान ओव्हरहॅंग्स आणि उच्च ग्राउंड क्लीयरन्ससह येते. त्याची लांबी 4.3 मीटर आहे.

  • समोर कोणत्याही प्रकारची ग्रील मिळाली नाही.

  • हेडलाइट्स आणि डीआरएलचा सेटअप पूर्णपणे एलईडी आहे.

  • बाजूला ORVM ऐवजी कॅमेरे देण्यात आले आहेत.

  • दरवाजे उघडण्यासाठी फ्लश डोअर हँडल आहेत. चाकाचा आकारही मोठा आहे.

  • तसेच, याक्षणी हे एक संकल्पना मॉडेल (Model) आहे, जे उत्पादनात येईपर्यंत बरेच बदल केले जाऊ शकतात. असे देखील म्हटले जात आहे.

Maruti Suzuki Electric Car

मारुती इलेक्ट्रिक SUV eVX चे स्पेसिफिकेशन्स :

  • परिमाण: 4,300 मिमी लांबी x 1,800 मिमी रुंदी x 1,600 मिमी उंची

  • प्लॅटफॉर्म: सर्व नवीन समर्पित EV प्लॅटफॉर्म

  • बॅटरी: 60kWh बॅटरी पॅक, सुरक्षित ड्रायव्हिंग तंत्रज्ञान

  • ड्रायव्हिंग रेंज: 550 किमी पर्यंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT