Marriage Saam tv
लाईफस्टाईल

Marriage tips : मुलगा कितीही श्रीमंत असला तरी 'या' १ सवयीमुळे मुलीचं आयुष्य होईल उद्ध्वस्त; लग्नाआधीच व्हा सावधान

things to check before daughter's marriage : मुलीचं लग्न ठरवताना फक्त पैसा, घर किंवा नोकरी पाहून निर्णय घेऊ नका. मुलाचा स्वभाव, विशेषतः रागावर नियंत्रण आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा मुलीच्या वैवाहिक आयुष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Namdeo Kumbhar

Marriage compatibility tips : मुलगा खूप श्रीमंत आहे, त्याचं स्वत:चं घर आहे... तो चांगला कमवतो...फक्त हेच पाहून जर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरवत असाल, तर थांबा... कारण पैसा माणसाला सुख सुविधा देऊ शकतो, पण सुखी संसार नाही. पुरुषांमधील अशी एक सवय आहे, जी श्रीमंतीतही घराचा नरक बनवू शकते. श्रीमंती, पैशाच्या मोहापायी पालक बऱ्याचदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल, तर लग्नाआधी मुलाची ही सवय नक्की पाहा. जर त्या मुलामध्ये ती एक सवय आढळली, तर मुलीचे लग्न चुकूनही अशा मुलाशी लावू नका, अन्यथा तिचे भविष्य उद्ध्वस्त झालं म्हणूनच समजा...

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन कुटुंबांचंही एकत्र येणं होय. त्यामुळे जोडीदार निवडताना विचार करावाच, त्यात मुलीसाठी मुलगा शोधताना तर पालकाने जास्तच विचार करावा. फक्त संपत्ती अन् मोठेपणा पाहून लग्न लावल्यानंतर अनेकदा तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे मुलीसाठी स्थळ पाहताना फक्त मुलाकडील पैसे पाहण्यापेक्षा त्याचा स्वभाव, वागणूक अन् विचार जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर मुलगा समजूतदार चांगला असेल तर मुलगी आयुष्यभर सुरक्षित अन् शांततेत राहील.

मुलाची एक सवय नक्की पाहा, अन्यथा...

पैशामुळे सुख नक्कीच मिळेल. पण नाती जपण्यासाठी समज आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. एखादा पुरूष चांगले कमावत असेल अन् त्याचा स्वभाव कठोर अन् अति रागीट असेल तर घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. रागाचा अनियंत्रित उद्रेक आणि इतरांवर नियंत्रण ठेवण्याच्या सवयी भविष्यात नातेसंबंध पूर्णपणे बिघडवू शकतात. एखाद्या पुरुषाचा स्वभाव असा असेल तर त्याच्यासोबत मुलीचं लग्न लावण्याची चूक कधीच करू नका. अन्यथा मुलीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल.

ही सवय धोकादायक का आहे?

जर एखादा व्यक्ती स्वभावाने अति रागीट असेल अथवा त्याचं रागावर नियंत्रणच नसेल तर तो आपल्या जोडीदाराचा अपमान करण्याची कोणतीही कसर सोडणार नाही, याची दाट शक्यता असते. मनाप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाहीत, तर तो व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशी लोकं आपल्या जोडीदाराला मानसिकरित्या खच्चीकरण करतात. इतकचे नव्हे तर जोडीदाराने काय खावं, काय घालावे, कुणाला बोलावे, कुठे जावं या प्रत्येक गोष्टी त्याच्या इच्छेनुसारच हव्या असे वाटू लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एखादा व्यक्ती स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो भविष्यात हिंसकही होऊ शकतो.

कसा ओळखाल स्वभाव ?

फक्त एकदा भेटल्यानंतर स्वभाव ओळखणं कठीण आहे. पण लहानसहान गोष्टीवरून माणूस ओळखता येऊ शकतो. तो व्यक्ती इतरांसोबत कसा बोलतो. त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी त्याचे वर्तन कसे आहे याचे निरीक्षण करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या मुलाला रेस्टॉरंटमध्ये भेटायला गेलात, तर तो तेथील कर्मचारी, वेटर, ड्रायव्हर किंवा रस्त्यात भेटणाऱ्या इतर कोणाशीही कसा संवाद साधतो याचे निरीक्षण करा. जर त्याचा सूर उद्धट असेल, तर हाच त्याचा खरा स्वभाव आहे.

तुमच्या मुलीवर गरजेपेक्षा जास्त निर्बंध घालतो का? तो मुलगा लग्नाआधीपासूनच, तुमच्या मुलीवर गरजेपेक्षा जास्त नियंत्रण ठेवत असेल, तर हा एक मोठा धोक्याचा इशारा असू शकतो. चुका मान्य करण्यास नकार देत असेल तरीही त्याचा स्वभाव रागीट असू शकतो. जर एखादा व्यक्ती आपल्या चुका मान्य करत नाही आणि त्याऐवजी इतरांना दोष देतो, हे त्याच्या नियंत्रक स्वभावाचे लक्षण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

SCROLL FOR NEXT