Parwal Sweet Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2022 : यंदाच्या सणासुदीत बनवा 'ही' खास मिठाई, आरोग्य देखील राहिल उत्तम !

सण साजरे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घरी मिठाई बनवणे, कारण बाजारातील मिठाईपेक्षा घरी बनवलेल्या मिठाई अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali 2022 : सण साजरे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घरी मिठाई बनवणे, कारण बाजारातील मिठाईपेक्षा घरी बनवलेल्या मिठाई अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी (Healthy) असतात, कारण तुम्ही त्यात कमी साखर वापरू शकता किंवा ब्राउन शुगरमध्येही (Sugar) मिठाई बनवू शकता. ही मिष्टान्न पटकन तयार होते. चला तर मग पाहूयात

पडवळ मिठाई बनवण्यासाठी साहित्य -

पडवळ, खवा, बदम, पिस्ता, साखर, वेलची पावडर

पडवळ बनवण्याची पद्धत -

१. प्रथम परवाल नीट धुवून सोलून घ्या. आता पुन्हा धुवा.

२. आता त्यात एक कट करा आणि १० मिनिटे पाण्यात उकळा.

३. आता ते पाण्यातून बाहेर काढा आणि कोरडे होऊ द्या.

४. आता एका पॅनमध्ये त्यात खवा घाला. गॅस मंद आचेवर चालू ठेवा.

५. आता त्यात बदाम आणि पिस्ता घाला.नंतर साखर घाला, शेवटी वेलची पूड घाला.

६. घट्ट झाल्यावर बाहेर काढून ठेवा. थंड झाल्यावर परवाळमध्ये भरा.

७. आता साखरेचा पाक तयार करा. पाक जास्त घट्ट करू नका.

८. त्यात परवाळ घालून लेप करा. अतिरिक्त पाक काढा.

९. तुमची मिष्टान्न तयार आहे. हवाबंद डब्यात साठवा. लक्षात ठेवा त्यात पाणी घालू नका.

टीप :

तुम्हाला हवे असल्यास साखरेऐवजी गूळ किंवा ब्राऊन शुगर वापरू शकता.

तुम्ही पडवळ आधी पाकात बुडवून मग त्यात खवा भरू शकता.

तुम्ही तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स पण घालू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT