Karwa Chauth Saam Tv
लाईफस्टाईल

Karwa Chauth : या पद्धतीने बनवा करवा चौथच्या दिवशी 'गोभी अचार', कमी वेळात पटकन बनेल !

आचारी गोभी हा एक वेगळ्या चवीचा पदार्थ आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karwa Chauth : आचारी गोबी हा एक वेगळ्या चवीचा पदार्थ (Food) आहे. ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची कोबी खायला आवडते, त्यांना ही डिश नक्कीच आवडेल. हे बनवण्यासाठी लोणच्याची गरज नाही, तर ते लोणच्याच्या मसाल्यात (Spices) शिजवले जाते, ते तुम्हाला आवडेल इतके चविष्ट आहे.

साहित्य -

कोबी, कांदा, मेथीदाणे, राई, हिंग, जिरे, बडीशोप, जिरेपूड, कांद्याची बी, मीठ, हळद, लाल तिखट, धनेपावडर, हिरवी तिखट, आले-लसूण पेस्ट, दही, मोहरीचे तेल, कोथिंबीर, आले

आचारी कोबी बनवायची पध्दत -

१) हे बनवण्यासाठी तेल गरम करून त्यात मेथी, मोहरी, जिरे, बडीशेप, हिंग आणि फोडणी घालावी.

२) धनेपूड, जिरेपूड घालून चांगले तडतडू द्यावे. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून चांगला परता.

३) आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, हळद, लाल तिखट घालून पुन्हा एक मिनिट परतून घ्या.आता त्यामध्ये फुलकोबीची फुले व मीठ घाला.

४) त्यात १-२ चमचे पाणी शिंपडा आणि चांगले मिक्स करून झाकून अर्धे शिजू द्यावे.आणि मग त्यात आले-लसूण पेस्ट घालून दही मिसळा.

५) मध्यम आचेवर ४-५ मिनिटे दही ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत तळा.आचारी गोबी तयार आहे, त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि आले घालून सजवा.

Edited By - Shraddha Thik

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT