Ganesh Chaturthi 2022  Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2022 : लाडक्या बाप्पासाठी बनवा ओरियो बिस्किटचे टेस्टी मोदक!

ओरियोच्या बिस्किटांचे मोदक कसे बनवाल ?

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi 2022 : काही क्षणांच्या विलबनानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. या दिवसात आपण बाप्पाला नाना तऱ्हेचे पदार्थ खाऊ घालतो.

ऑगस्टच्या ३१ तारखेपासून गणेश उत्सव सुरु होणार आहे. प्रत्येकासाठी खास असणाऱ्या बाप्पाचे आगमन होणार म्हणून प्रत्येकजण १० दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य ठेवणार. परंतु, दररोज बाप्पाला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य द्यायचा या चिंतेत आपण असतो. त्यात मोदक, मोतीचुरचे लाडू, बेसनचे लाडू, तांदळाची खीर असे पदार्थ बनवता येतात.

घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात. मोदकाचे अनेक प्रकार बनवले जातात. चॉकलेटचे मोदक, माव्याचे मोदक, बुंदिचे मोदक व उकडीचे मोदक अशा बऱ्याच प्रकारचे मोदक आपल्या इथे तयार केले जातात.

आपल्या लहानग्याला बिस्किट भरपूर आवडते आणि त्यात चॉकलेटचे असेल तर त्याची चव वेगळीच ! मुलांच्या (Child) आरोग्याची काळजी घ्यायची असेल व त्यांना अतिप्रमाणात बिस्किटांचे सेवन करु नसेल द्यायचे तर ओरियोच्या बिस्किटांचे मोदक बनवू शकतो.

साहित्य -

ओरियो बिस्किटे - ४ पुडे

दूध (Milk) - २ ते ४ चमचे

मिल्कमेड किंवा मलाई - ३ ते ४ चमचे

नारळाचा किस - २ चमचे

कृती -

सर्वप्रथम ओरियो बिस्किटमधून क्रीम काढून बाजूला ठेवा. आता बिस्किटे बारीक करून त्याची पावडर बनवा. ते मिसळण्यासाठी पाणी वापरू नका. त्यात दुधाची साय आणि दूध घालून पीठ तयार करा. नारळाचा किस आणि ओरियो क्रिम दोन्ही चांगले मिक्स करुन सारण बनवून घ्यावे आणि आता पीठाचे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यात ठेवा. आपल्या बोटाने दाबून छिद्र करा आणि सारणाचे फिलिंग करा. मोदक तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gashmeer Mahajani: गळ्यात कवड्याची माळ अन् कपाळाला मळवट; गश्मीर महाजनीचा नव्या अवतारातला थरारक 'गोंधळ'

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील महागावात हॉटेलवर धाड; १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त

Korean Investment In Maharashtra: कोरियन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करणार; पुण्यात झाली महत्वाची बैठक

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात फ्रेश आणि ग्लोइंग लूक कसा ठेवावा? वापरा या सोप्या मेकअप टिप्स

Kalyan News : रिडेव्हलपमेंट सुरू असताना सुरक्षा भिंतीवरून वाद; दोन विकासक गटात तुंबळ हाणामारी

SCROLL FOR NEXT