लाईफस्टाईल

Mahatma Gandhi Jayanti Marathi Wishes: महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा आणि मेसेजस

Mahatma Gandhi Thoughts: महात्मा गांधी जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना खास मराठी शुभेच्छा, प्रेरणादायी संदेश आणि कोट्स शेअर करा. सत्य, अहिंसा आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या बापूंना वंदन करा आणि या पवित्र दिवशी समाजात सकारात्मक विचार पसरवा.

Dhanshri Shintre

दरवर्षी २ ऑक्टोबरला भारतासह संपूर्ण जगात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अहिंसात्मक आंदोलनामुळे त्यांना ‘राष्ट्रपिता’ आणि ‘बापू’ म्हणून ओळखले जाते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या कार्यामुळे ते जागतिक पातळीवरही प्रेरणास्त्रोत ठरले. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण गांधीजींच्या जीवनमूल्यांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करूया.

गांधीजींचे विचार मनात साठवा

सत्य, अहिंसेचे धडे आत्मसात करा

देशासाठी जे दिले त्यांनी

त्या कार्याचा बाळगा अभिमान!

गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

गांधीजींनी आपल्याला शिकवले

की एका व्यक्तीच्या कृतीतूनही

बदल घडू शकतो

चला, आपण तो बदल बनूया

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

बापू म्हणजे महान व्यक्ती

देशासाठी जे कायम झिजले

गांधी जयंतीनिमित्ताने करा स्मरण

त्यांच्या आदर्शांचे करू पालन

गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

या शुभदिनी, प्रेम, शांतता आणि सलोखा

पसरवण्याचा संकल्प करूया

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याचा प्रत्येक दिवस

हा शेवटचा म्हणून जगा

आणि असं शिका की तुम्ही

अमर राहणार आहात

महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्न व पुरवठा विभातील लाचखोर अधिकारी, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Dadar Station : मुंबईकरांची गर्दीपासून सुटका! 'या' महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर उभारणार एलिव्हेटेड डेक; जाणून घ्या

Maheshwari Saree Fashion: मिथिलाने नेसलेली महेश्वरी साडीचा ट्रेंड करा फॉलो; लग्नात सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

Ayesha Khan: 'धुरंधर' चित्रपटातील 'शरारत' गाण्यामुळे चर्चेत आलेली आयेशा खान कोण?

Warm Water Benefits: सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने 'हे' आजार होतात दूर

SCROLL FOR NEXT