Mahashivratri 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला अशा पद्धतीने करा 'रुद्राभिषेक', सर्व दु:ख दूर होतील

रुद्राभिषेक घरी किंवा शिवमंदिरात केल्यास खूप फायदा होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mahashivratri 2022: मुंबई: महाशिवरात्रीचा सण मंगळवार, 1 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक विशेष मानला जातो. रुद्राभिषेकाचा महिमा वेदांमध्येही वर्णिला आहे. यजुर्वेदात असे सांगितले आहे की रुद्राभिषेक घरी किंवा शिवमंदिरात केल्यास खूप फायदा होतो. रुद्राभिषेक केल्याने ग्रह-नक्षत्रांचे वाईट प्रभाव संपतात. यासोबतच आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात. जाणून घ्या रुद्राभिषेक करण्याची योग्य पद्धत.

रुद्राभिषेक विधी

रुद्राभिषेकासाठी शिवलिंग उत्तर दिशेला ठेवावे. अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने किंवा इतर व्यक्तींनी पूर्वेकडे तोंड करुन बसणे उत्तम मानले जाते. प्रथम शिवलिंगावर पळीने (अभिषेक करणारे पात्र) गंगाजल घाला आणि नंतर अभिषेक सुरू करा. रुद्राभिषेकादरम्यान महामृत्युंजय मंत्र, शिव तांडव स्तोत्र, शिव पंचाक्षर मंत्र किंवा रुद्र मंत्राचा जप करावा.

पूजा करताना शिवलिंगावर चंदन लावावे. यानंतर शिवलिंगावर विड्याचं पान, सुपारी, बेलपत्र इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करावे. यानंतर शंकराला केलेला भोग अर्पण करावा. तसेच, शिव मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर शंकराची आरती करावी. शंकराची आरती झाल्यावर अभिषेकाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. अभिषेक करताना शिव मंत्रांचा जप करत राहणे चांगले मानले जाते.

अभिषेकपूर्वी या देवतांचे आवाहन करा

रुद्राभिषेक ही एक महत्त्वाची पूजा आहे. अशा परिस्थितीत अभिषेक सुरू करण्यापूर्वी देवतांचे आवाहन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण श्रीगणेशाचे आवाहन करतो. यानंतर देवी पार्वती, नवग्रह, देवी पृथ्वी, ब्रह्मदेव, देवी लक्ष्मी, अग्निदेव, सूर्यदेव आणि दोवी गंगेचे आवाहन आणि पूजा केली जाते. यानंतर अक्षता आणि फुले अर्पण करून सर्व देवतांची स्तुती केली जाते. यानंतर रुद्राभिषेक सुरू केला जातो.

रुद्राभिषेक पूजा समग्री

रुद्राभिषेक पूजेच्या साहित्यात गाईचे शुद्ध तूप, विड्याची पाने, फुले, चंदन, धूप, इत्र, कापूर, बेलपत्र, मिठाई, हंगामी फळे, मध, दही, ताजे दूध, गुलाबपाणी, सुका मेवा, पंचामृत, नारळ पाणी, उसाचा रस, चंदनाचे पाणी, गंगाजल, शुद्ध जल, सुपारी आणि नारळ यांचा समावेश होतो. रुद्राभिषेक सुरू करण्यापूर्वी सर्व सामुग्री एकत्र ठेवा. रुद्राभिषेकातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पळी (अभिषेकाचे पात्र). अभिषेकासाठी पितळी शृंगी सर्वोत्तम मानली जाते. तसे, इतर कोणत्याही धातूची पळी देखील वापरली जाऊ शकते.

(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. जानकारांचा सल्ला घ्यावा)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT