Magh Purnima 2024 Saam tv
लाईफस्टाईल

Magh Purnima 2024 : माघ पौर्णिमेला सकाळी करा या गोष्टी, आर्थिक चणचण पासून राहाल दूर

Magh Purnima 2024 Tithi : माघी पौर्णिमेला स्नान, दान आणि जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही कामे करणे अशुभ असते. ज्यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.

कोमल दामुद्रे

Magh Purnima 2024 Date And Time :

प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते. असे मिळून वर्षभरात १२ पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे स्वत:चे असे महत्त्व आहे. परंतु वर्षातील चार पौर्णिमांपैकी कार्तिक, वैशाख, श्रावण आणि माघ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

माघी पौर्णिमेला स्नान, दान आणि जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही कामे करणे अशुभ असते. ज्यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. यंदा ही माघी पौर्णिमा २४ फेब्रुवारीला आहे. पौर्णिमा प्रारंभ तिथी २३ फेब्रुवारीला दुपारी ३.३३ मिनिटांनी होईल तर समाप्ती २४ फेब्रुवारी सायंकाळी ५.५९ मिनिटांनी संपेल.

माघी पौर्णिमेला अनेकजण व्रत करतात. असे मानले जाते की, गंगेत स्नान करून दान केल्याने देवताही प्रसन्न होतात. जाणून घ्या पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.

1. माघ पौर्णिमेला काय करु नये

  • ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला चुकूनही तामसिक अन्न (Food) खाऊ नका. तसेच मद्यपानही करु नका.

  • असे म्हटले जाते की, चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी तुळस, आवळा, केळी (banana) आणि पिंपळाच्या झाडाची पाने तोडू नका. या सर्वांमध्ये भगवान विष्णूचा वास असतो.

  • या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. याचा विपरीत परिणाम जीवनावर होतो.

  • ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गंगा स्नान केल्यानंतर धन दान करावे. यासोबतच पितरांची पूजा करणे देखील लाभदायक आहे. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT