Lucky Numerology Couple Saam Tv
लाईफस्टाईल

Lucky Couple Numerology: एकमेकांच्या पीठीशी खंबीरपणे उभे असतात या मूल्यांकांचे लोक, 'या' कपलसारखी असते केमिस्ट्री

Lucky Numerology Couple Like Raghav Chadha And Parineeti Chopra : अंकशास्त्रानुसार, काही मूल्यांकांचे लोक एक- दुसऱ्यासोबत चांगले नाते निर्माण करतात त्यातच त्यांच्या नात्याचे रूपांतर प्रेमात होते आणि ते एक प्रभावी कपल बनतात.

Manasvi Choudhary

व्यक्तीच्या जीवनातील अंकशास्त्राला (Numerology) विशेष महत्व आहे. व्यक्तीच्या जन्मदिनांकवरून त्याचा मूलांक ठरतो. अंकशास्त्रानुसार, काही मूल्यांकांचे लोक एक- दुसऱ्यासोबत चांगले नाते निर्माण करतात त्यातच त्यांच्या नात्याचे रूपांतर प्रेमात होते आणि ते एक प्रभावी कपल बनतात.

सध्या राघव चढ्ढा हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीमुळे चर्चेत आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य तितकेच रहस्यमयी आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील घटनेचा अंदाज त्यांच्या मूलांकांवरून होतो असे मानतात. मूलांकांवरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याचा अंदाज ठरवला जातो. अशातच राघव चढ्ढा यांचा मूलांक किती आहे? हे जाणून घेऊया...

राघव चढ्ढा यांचा जन्म ११ नोव्हेंबरचा आहे यानुसार त्यांचा मूलांत २ आहे. पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राचा जन्म २२ ऑक्टोबर आहे तिचा मूलांक ४ आहे.

अंकशास्त्रानुसार, मूलांक २ आणि मूलांक ४ असलेले कपल सर्वात बेस्ट मानले जातात. या दोन्ही मूलांकांचे लोक एकमेकांचे जीवनसाथी बनले तर त्यांचे आयुष्य आनंदी राहते. राघव आणि परिणीता हे त्यापैंकी एक आहेत.

मूलांक २ चा स्वामी ग्रह आहे त्यामुळे या अंकाचे लोक स्वभावाने अत्यंत भावनिक, शांत आणि आदरपूर्वक असतात. जे इतरांच्या भावना समजूत घेतात आणि त्यांचा आदर करतात. तर दुसरीकडे मूलांक ४ चा स्वामी ग्रह आहे. या मूलांकांचे लोक धाडसी, व्यावहारिक असतात.

मूलांक २ आणि मूलांक ४ या लोकांचे नातेसंबंध आनंदी असते. या मूल्यांकांच्या नात्यात एकमेकांचा आदर केला जातो. कोणत्याही परिस्थितीमध्ये एक दुसऱ्यासोबत खंबीरपणे उभे असतात. विशेष म्हणजे या मूलांकाचे लोक एकमेकांची कमकुवत बाजू ओळखून तिच्याशी लढण्याचा प्रयत्न करतात.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टिव्ही याचे पुष्टीकरण करत नाही.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT