Lost Your FASTag  Saam Tv
लाईफस्टाईल

Lost Your FASTag : घाबरु नका ! अचानक कारमधून फास्टॅग चोरीला गेला? या गोष्टी लगेच करा, अन्यथा भरावे लागेल नुकसान

How To block Your FASTag : फास्टॅगच्या माध्यमातून संपूर्ण देशात टोल टॅक्स वसूल केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Deacgtive FASTag : फास्टॅगच्या माध्यमातून संपूर्ण देशात टोल टॅक्स वसूल केला जातो. सर्व वाहनांना ते वापरणे बंधनकारक आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना दंड म्हणून दुप्पट टोल टॅक्स भरावा लागतो. ही स्टिकरसारखी छोटी चिप असते, जी गाडीच्या विंडशील्डवर लावली जाते. याद्वारे खात्यातून पापणी लवताच टोल टॅक्स कापला जातो.

अनेक वेळा फास्टॅग (FASTag) चोरीला गेल्याच्या, हरवण्याच्या किंवा खराब झाल्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत, नवीन फास्टॅग वापरण्यासाठी जुना फास्टॅग डिएक्टिव्ह करणे महत्त्वाचे आहे. फास्टॅग डिएक्टिव्ह कसा करायचा ते पाहूयात.

FASTag खाते कसे बंद करावे?

FASTag डिएक्टिव्ह करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे FASTag कस्टमर केअरशी संपर्क साधणे आणि FASTag डिएक्टिव्ह करण्याची विनंती करणे. FASTag शी संबंधित प्रश्नांसाठी तुम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हेल्पलाइन 1033 वर कॉल करू शकता.

Axis Bank FASTag कसा डिएक्टिव्ह करायचा?

तुमच्या नोंदणीकृत ईमेलवरून FASTag रद्द करण्यासाठी लिहा आणि etc.management@axisbank.com वर सबमिट करा. किंवा 18004198585 वर बँकेला (Bank) कॉल करा आणि FASTag डिएक्टिव्ह करण्याची विनंती करा.

HDFC बँक FASTag कसा डिएक्टिव्ह करायचा?

स्टेप्स -

1 : वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून FASTag पोर्टलवर लॉग इन करा.

2 : सर्व्हिस रिक्वेस्टचा पर्याय निवडा.

3 : जनरेट सर्व्हिस रिक्वेस्ट पर्याय निवडा.

4 : RFID टॅग किंवा वॉलेट बंद करण्यासाठी विनंती प्रकारातील क्लोजर रिक्वेस्ट निवडा. किंवा 18001201243 वर कॉल करू शकता

Paytm ASTag कसा डिएक्टिव्ह करायचा?

1 : PayTM अॅपमध्ये साइन इन करा.

2 : 24x7 हेल्पडेस्क पर्यायावर जा.

3 : प्रकार निवडा.

4 : FASTag खाते (Account) बंद करण्यासाठी विनंती वाढवा/जोडा.

एअरटेल पेमेंट्स फास्टॅग कसा डिएक्टिव्ह करायचा?

एअरटेल पेमेंट्स बँकेने जारी केलेला FASTag डिएक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांक 400 किंवा 8800688006 वर कॉल करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT