Liver Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Liver Health Tips : यकृत निरोगी ठेवायचे आहे तर, या भाज्यांचे सेवन करा

यकृताचे आरोग्य निरोगी कसे राखाल ?

कोमल दामुद्रे

Liver Health Tips : आपल्या शरीरातील यकृत हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. आपण आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करायला हवा ज्यामुळे शरीर अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास सक्षम होऊ शकते.

अन्न पचन, चयापचय सुधारणे, जीवनसत्त्व (Vitamins) व खनिजांचा शरीरात पुरेसा साठा, रक्ततातील विघटकांना बाहेर काढणे, प्रथिन्यांचे प्रमाण आदी गोष्टी यकृत खराब झाल्यानंतर स्वत:ला पुन्हा निर्माण करण्याची क्षमता त्यात असते. परंतु, आपण आहारात काय खातो व काय पितो यावर सगळे अवलंबून असते.

यकृत निरोगी ठेवण्यासाठी असे बरेच पदार्थ आहेत, विशेषतः भाज्या, जे ते निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील कोणत्याही प्रकारचे नुकसान भरून काढण्यास मदत करतात.

आपण आपल्या आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करायला हवा जाणून घेऊया

१. बीट -

बीट हे कंदमूळ असून याची भाजी बनवून खाल्ली जाते. याची चव प्रत्येकाला आवडत नसली तरी ते शरीरासाठी फायदेशीर असते. बीटाचा रस प्यायल्याने आपले यकृत निरोगी राहण्यास मदत होते. यात भरपूर अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे यकृताला कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून वाचवण्याचे काम करतात.

२. ब्रोकोली -

ब्रोकोलीच्या सेवनाने फॅटी लिव्हर डिसीज किंवा लिव्हर ट्यूमरच्या समस्येपासून दूर राहू शकतो. आपण कच्चे किंवा शिजवून सुध्दा याचे सेवन करु शकतो. याचे सेवन शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. त्याचे सेवन यकृताच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

३. ब्रुसेल्स स्प्राउट्स-

ब्रुसेल्स स्प्राउट्स पचनक्रिया सुधारते आणि जीवनसत्त्वे व खनिजे प्रदान करते. इतकेच नाही तर यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यास मदतही करते. यकृत आणि फुफ्फुसांमध्ये डिटॉक्सिफायिंग एंजाइम सोडते. भाजून किंवा वाफवून आपण त्याचा आहारात समावेश करू शकता.

४. हिरव्या पालेभाज्या -

पालक, केळी (Banana), हिरव्या भाज्या यासारख्या पालेभाज्या देखील यकृताच्या एकूण आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. यात अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सने देखील आहे. जे यकृतासह शरीराच्या अनेक अवयवांना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT