'सॅड साॅंग' ऐकून नांदेडमधील तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले..! SaamTvNews
लाईफस्टाईल

'सॅड साॅंग' ऐकून नांदेडमधील तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले..!

अंगाचा थरकाप होऊन दरदरून घाम येतो आणि तो ओरडायला लागतो. हे गाणे ऐवढे वेदनादायक आहे की गाणे ऐकल्यानंतर त्याकाळात मोठ्याप्रमाणात आत्महत्या केल्या होत्या.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : संगीतात एवढी ताकद आहे की एखादा नैराश्यात गेलेला व्यक्ती मनपसंत गाण्याने नैराश्य घालवतो. तर काहीजण दुखाःत किंवा प्रेमभंग झाले तर दर्दभरे गाणी सॅड साॅंग (Sad Song) ऐकुन आपलं नैराश्य घालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नांदेडच्या एका तरुणाला एक हंगेरीयन सॅड साँग ऐकल्यानंतर मानसिक संतुलन बिघडलयं. (Listening to 'Sad Song' disturbed the mental balance of the youth in Nanded)

हे देखील पहा :

नांदेड (Nanded) जिल्ह्य़ातील मुदखेड तालुक्यातील एका 21 वर्षीय तरुणाला एक हंगेरीयातील संगितकार आमचे 'सॅड साॅंग' ऐकले आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडले. अंगाचा थरकाप होऊन दरदरून घाम येतो आणि तो ओरडायला लागतो. असा त्रास वारंवार होत असल्याने या तरुणाने मानसोपचारतज्ज्ञाकडे येऊन उपचार घेतले तीन दिवसाच्या उपचारानंतर या तरुणाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.

पहिल्या महायुद्धा नंतर 1933 मध्ये हंगेरीयातील संगितकार रेजोस सेरेस यांनी प्रेमभंग झाल्याने तयार केलेल्या 'सॅड साॅंग' अर्थात 'गुल्मी संडे 'नावाचे गाणे तयार केले. हे गाणे ऐवढे वेदनादायक आहे की गाणे ऐकल्यानंतर त्याकाळात मोठ्याप्रमाणात आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतर या गाण्यावर बंदी घातली गेली अलीकडे ही बंदी उठविण्यात आली. मुदखेड च्या तरुणाने हिंदी मध्ये डब केलेले हंगेरीयन सॅड साँग ऐकले आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडले.

गुगलवर हंगेरीयन हे सॅड साॅंग चाॅईस केले की गाणे ऐकणाऱ्याने आत्महत्या किंवा दुखापत करुन घेतल्यास सर्वस्वी जबाबदारी गाणे ऐकणाऱ्याची असेल असे नमुद केले आहे. सध्यातरुणाईत ब्ल्यू टूथ, ईअरफोन च्या माध्यमातून पाश्चात्य संगीत (Music) ऐकण्याची क्रेझ वाढलीय. तसंच बदललेली लाइफस्टाइल यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत चालल्याने चिंता वाढ झालीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT