मुंबई: होळी साजरी करण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कुठलाही सण साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाच्या होळीला लोकांमध्ये दुप्पट उत्साह पाहायला मिळत आहे. मोठ्या जल्लोषात लोक होळीचा सण साजरा करत आहेत. होळीच्या दिवशी जास्तकरुन लोक पांढरे कपडे घालण्याची फॅशन आहे. मात्र, यामागे फक्त फॅशन नाही तर इतरही काही कारणं आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत (Know the spiritual reason behind people wear white clothes on Holi).
ज्योतिषशास्त्रीय कारणं काय?
होळी (Holi) खेळताना लोक अनेकदा पांढरे कपडे (White Clothes) घालतात. याची अनेक कारणे आहेत. ज्योतिषशास्त्रातही होळीच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.
पांढरा रंग चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्र (Moon) हा मनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने व्यक्ती सकारात्मक आणि आनंदी राहातो. जुनी भांडणं, वैमनस्य विसरुन तो सहज शत्रूलाही मिठी मारतो.
पांढरा रंग बंधुभाव आणि सुख-शांतीचे प्रतीक मानला जातो. होळीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने बंधुभाव वाढतो, नातेसंबंध सुधारतात आणि मन प्रसन्न होते.
कुंडलीत कोणताही ग्रह नकारात्मक प्रभाव देत असेल, तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आराम मिळतो. पांढरे कपडे परिधान केल्याने व्यक्तीला यश (Success) मिळते.
पांढऱ्या रंगाचे कपडे उष्णतेपासून आराम देतात. होळीच्या सण येईपर्यंत उन्हाचा तापही वाढलेला असतो. अशात पांढरे कपडे परिधान केल्याने व्यक्तीला दिलासा मिळतो.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.