Power naps information in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जाणून घ्या, पॉवर नॅपचे फायदे आणि झोप किती वेळ असावी?

पॉवर नॅप्स म्हणजे काय ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सकाळी मन लावून काम करून थोडा वेळ विश्रांती घ्याला सर्वांना आवडते. हल्ली पॉवर नॅप कुठेही घेता येतो. अगदी प्रवास (Travel) करताना बस किंवा ट्रेन (Train)मधेही. झोपेतून उठल्यानंतर तासाभराच्या मेहनतीमध्ये २० मिनिटेही पॉवर नॅप घेतली, तर उठल्यानंतर शरीराला काम करण्यास गती मिळते. पॉवर नॅप घेतल्यानंतर मन आणि शरीर चार्ज झालेले असते. यासारख्या छोट्या झोपेचे बरे वाटण्याव्यतिरिक्त अनेक फायदे आहेत.

हे देखील पहा -

पॉवर नॅप्स घेतल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. कोणतेही काम करताना मन शांत राहते आणि विचलित होत नाही. एक डुलकी साधारणत: २० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावी.

पॉवर नॅप्सचे फायदे जाणून घ्या

१. डुलकी घेतल्याने शरीर आणि मनाला आराम मिळतो.

२.एक डुलकी घेतल्यानंतर, तुम्हाला पुढील ६ तास काम करण्याचा उत्साह राहिल.

३. पॉवर नॅप्स घेतल्याने मूड चांगला राहतो व एकाग्र राहून काम करण्यास मदत मिळते.

४. पॉवर नॅप्सचे प्रौढांसाठी अनेक प्रकारे फायदे आहेत.

५. तसेच पॉवर नॅप्समुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते व तणाव (Stress) कमी होऊन हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

६. पॉवर नॅप्स ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावी. कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपल्यामुळे शरीरला गाढ झोप लागते. त्यामुळे पुरेशी झोप न घेता जागे झाल्यास शरीर सुस्त वाटू लागते.

७. पॉवर नॅप घेण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.

८. पॉवर नॅप्स घेताना अलार्म लावून झोपा व झोपण्यासाठी शांत जागा निवडा.

अशाप्रकारे तुम्ही पॉवर नॅप्स घेऊ शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळ्यामागे तब्बल इतके वाढले, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

SCROLL FOR NEXT