weight loss diet google
लाईफस्टाईल

Millet Nutrition : वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी, कोणती भाकरी आहे जास्त फायदेशीर?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी कोणती भाकरी फायदेशीर आहे याबाबत शंका निर्माण होते. दोन्ही पोषणाने समृद्ध आहेत, मात्र आहारात संतुलित समावेश केल्यास उत्तम परिणाम दिसतात.

Sakshi Sunil Jadhav

आजकाल वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहारावर विशेष लक्ष देतात. भारतीय घरांमध्ये प्रामुख्याने गव्हाची चपाती खाल्ली जाते. मात्र आरोग्याची जाणीव असलेले लोक गव्हाची चपाती खाणं टाळू लागले आहेत. कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे लोक निरोगी पर्याय म्हणून ज्वारी किंवा नाचणीची रोटी खाणे पसंत करतात.

कारण ज्वारी आणि नाचणी हे दोन्हीही पोषणाने समृद्ध धान्य आहेत. त्यात प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हे धान्य केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत, तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील उपयुक्त ठरतात. पण अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की वजन कमी करण्यासाठी ज्वारी चांगली की नाचणी?

ज्वारीच्या भाकरीमध्ये प्रथिनांसोबत फायबरही मुबलक प्रमाणात असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि भूक वारंवार लागत नाही. त्यामुळे जास्त खाणे टाळले जाते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. दुसरीकडे, नाचणी म्हणजेच रागीच्या भाकरीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम मानले जाते. त्यातही फायबर आणि अमिनो अॅसिड असतात, जे पचन सुधारतात.

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी ज्वारी आणि नाचणी दोन्हीही फायदेशीर आहेत. मात्र ज्वारीच्या रोटीत कॅलरीज तुलनेने कमी असल्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती थोडी अधिक उपयुक्त ठरते. तर नाचणीच्या रोटीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे दीर्घकाळ आरोग्य सुधारण्यासाठी ती फायदेशीर मानली जाते. त्यामुळे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार या दोन्ही भाकऱ्यांचा आहारात समावेश केला तर उत्तम परिणाम दिसून येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT