Jio Diwali Offer  Saam Tv
लाईफस्टाईल

Jioची धमाकेदार Diwali Offer! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार 912GB डेटापॅकेज

Diwali Recharge Offer : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

Shraddha Thik

Jio Diwali Offer :

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ जेव्हाही कोणताही रिचार्ज प्लॅन आणतो तेव्हा कंपनी नेहमी ग्राहकांची काळजी घेते की युजर्सच्या खिशावर कोणताही एक्स्ट्रा भार पडणार नाही. दिवाळीच्या निमित्ताने जिओ आपल्या युजर्सना विविध प्रकारच्या ऑफर देत आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक धमाकेदार दिवाळी ऑफर सादर केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिलायन्स जिओ दिवाळी (Diwali) ऑफरमध्ये आपल्या युजर्सना रिचार्ज प्लानमध्ये एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देत आहे. दिवाळी ऑफरमध्ये रिचार्ज केल्यावर, तुम्हाला 23 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. मात्र, कंपनीने आपल्या वार्षिक प्लानमध्ये ही ऑफर (Offer) दिली आहे. जर तुम्ही दीर्घ वैधतेचा प्लान शोधत असाल तर तुम्ही Jio ची दिवाळी ऑफर तपासली पाहिजे.

जिओची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी ऑफर

Jio ने आपल्या रिचार्ज (Recharge) प्लानच्या यादीत 2999 रुपयांचा प्लान जोडला आहे. या प्लानमध्ये युजर्सना 23 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. तुम्ही तुमच्या Jio नंबरचा 2,999 रुपयांचा रिचार्ज केल्यास, तुम्ही संपूर्ण वर्षभर वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त व्हाल. युजर्सना प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता ऑफर केली जाते. यासह, तुम्ही संपूर्ण प्लानमध्ये 912.5GB डेटा वापरू शकता म्हणजेच तुम्हाला दररोज 2.5GB डेटा वापरायला मिळेल.

युजर्सना 5G कनेक्टिव्हिटी मिळेल

तुम्ही वर्षभर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. यासोबतच कंपनी दररोज 100SMS देखील देते. तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध असलेल्या भागात राहिल्यास, पात्र सदस्यांना अमर्यादित 5G डेटामध्ये प्रवेश देखील मिळेल.

जर आपण या प्लानच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोललो, तर ग्राहकांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मिळते. जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त व्हायचे असेल, तर ही प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT