Jio New Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio New Recharge Plan : Airtel-Vodafone ला jioचा प्लान देतोय टक्कर ! 388 दिवसाच्या वैधतेसह डेली 2 Gbडेटा व अनलिमेटेड कॉलिंग फ्री

Jio Yearly Recharge Plan : जिओच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांऐवजी ३८८ दिवसांची वैधता दिली जात आह

कोमल दामुद्रे

Recharge Plan : आपल्यापैकी बरेच लोक महिन्याला महिना रिचार्ज करतात परंतु, दरमहिन्याच्या या रिचार्जमुळे अनेकांची तारांबळ उडते. काही टेलिकॉम कंपन्या अशा आहेत की, त्या आपल्याला वर्षभराचा रिचार्ज अगदी कमी किंमतीत ऑफरमध्ये देत असतात. त्यातीलच एक 'जिओ'. तर आम्ही तुमच्यासाठी Jio चा परवडणारा प्रीपेड प्लॅन घेऊन आलो आहोत.

जिओच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांऐवजी ३८८ दिवसांची वैधता दिली जात आहे. जिओचा हा प्लान एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला त्याच्या फायद्यांसह किती टक्कर देत आहे याबद्दल तुम्हाला येथे सांगणार आहोत.

1. जिओचा 2,879 रुपयांचा प्लान:

जिओचा 2,879 रुपयांचा (Price) प्लानमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. 365 दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग (Call) सुविधा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना Jioअॅप्स फ्रीमध्ये मिळतात. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत होतो, म्हणजेच अमर्यादित डेटा ऍक्सेस उपलब्ध आहे. 365 दिवसांच्या या प्लानमध्ये 23 दिवसांची अतिरिक्त वैधता आणि अतिरिक्त 87GB डेटा दिला जात आहे.

2. एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्लान:

एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्लान दररोज 2GB डेटा ऑफर करतो. या प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये FASTag रिचार्जवर Apollo 24|7 Circle, मोफत Hello tunes, Wynk Music मोफत (Free) आणि Rs 100 चा कॅशबॅक उपलब्ध आहे.

3. Vodafone Idea Rs 3,099 प्लान:

Vodafone Idea Rs 3,099 प्लानमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. 365 दिवसांच्या वैधतेसह, हा प्लान अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन इतर फायदे म्हणून 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. अमर्यादित नाईट डेटा अंतर्गत, कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अमर्यादित डेटाचा लाभ मिळतो. वीकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत, वापरकर्ते सोमवार ते शुक्रवार वीकेंडमध्ये (शनिवार आणि रविवार) उर्वरित डेटा वापरु शकतात. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दर महिन्याला 2GB पर्यंत डेटा बॅकअप उपलब्ध आहे. सदस्यांना Vi Movies आणि TV VIP प्रवेश विनामूल्य मिळतो. त्याच वेळी, डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbpsपर्यंत जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT