Jio Smart Car Device Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Smart Car Device : कार चोरी होण्यापासून वाचवणार जिओच डिव्हाइस, वर्षभर फ्री सर्व्हिस, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Jio Motive : रिलायन्स जिओने तुमची ही समस्या सोडवली आहे. जिओने छोटे डिव्हाइस आणले असून ज्यामुळे 24x7 तुमच्या कारचे संरक्षण करेल.

कोमल दामुद्रे

Jio Car Device :

हल्ली कार चोरीला जाण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. यासाठी रिलायन्स जिओने तुमची ही समस्या सोडवली आहे. जिओने छोटे डिव्हाइस आणले असून ज्यामुळे 24x7 तुमच्या कारचे संरक्षण करेल.

जिओने नुकतेच Jio Motive डिव्हाइस आणले आहे. नुकताच हा छोटा डिव्हाइस भारतात लॉन्च केला आहे. कमी किमत परवडणारी कार एॅक्सेसरी आहे. हे कारच्या OBD पोर्टशी जोडलेली आहे. तसेच ते प्लग-एन-प्ले डिव्हाइस म्हणून काम करेल. तसेच हे कारमध्ये स्वत: इन्स्टॉल करु शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या डिव्हाइसची किमत ४,९९९ रुपये (Price) आहेत. हे डिव्हाइस Amazon, Reliance Digital e-commerce sites, Jio.com रिटेल आउटलेट स्टोअर्सवरुन खरेदी केले जाऊ शकते. यामध्ये वापरकर्त्यांना वर्षभरासाठी फ्री सबस्क्रिप्शन (Subscription) मिळेल. तर वर्षभरानंतर ५९९ रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. या डिव्हाइसची तुम्हाला वर्षभर वॉरंटी मिळेल.

1. कारला कसे कनेक्ट कराल?

Jio Motive डिव्हाइस कनेक्ट करणे खूप सोपे आहे. हे कारच्या OBD पोर्टशी जोडले जाऊ शकते. हे डिव्हाइस स्टीयरिंग व्हीलच्या जवळ लावता येईल. जिओ उपकरणांमध्ये 4G GPS ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध आहे. हे कारचे (Car) लोकेशन लाइव्ह दाखवते. ज्याद्वारे तुम्ही कारचे लोकेशन ट्रॅक करु शकतो.

2. अॅपद्वारे कनेक्ट होईल

हे डिव्हाइस कारच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवेल. वापरकर्ते अॅपवरुन डायग्नोस्टिक ट्रबल कोड (DTC)अलर्टबद्दल माहिती मिळवता येईल. तसेच तुम्ही कोणत्या पद्धतीने ड्रायव्हिंग करताय तसेच रस्ता कसा आहे याविषयी देखील सविस्तर माहिती मिळेल. तुमची कार चोरीला गेल्यानंतर तुम्हाला अलर्ट देखील मिळेल. हे डिव्हाइस फक्त जिओ सिमशी कनेक्ट केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साकोलीत नाना पटोले पिछाडीवर

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT