Jio Recharge Plan  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge Plan : जिओचा दिवाळी धमाका! लॉन्च केला जबरदस्त प्लान, अनलिमिटेड कॉलिंग्सह मिळणार सबस्क्रिप्शन फ्री

Jio New Recharge : टेलिकॉम कंपनी जिओने देखील दिवाळी धमाका रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे.

कोमल दामुद्रे

Jio Diwali Dhamaka 2023 :

सध्या दिवाळीचा सण सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला ऑफर्स पाहायला मिळत आहे. अशातच टेलिकॉम कंपनी जिओने देखील दिवाळी धमाका रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे.

रिलायन्स जिओने फार कमी कालावधीत मार्केटमध्ये नाव कमावले आहे. कंपनीचे देशभरात सर्वात जास्त ग्राहक आहेत. कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लान लॉन्च करत असते. अशातच जिओने अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि OTT सबस्क्रिप्शनचा प्लान लॉन्च केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्लानमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लाटफॉर्मची मेंबरशिप मिळणार नसून फक्त ऑनलाइन सेवा मिळणार आहे. तसेच कंपनी (Company) या प्लानमध्ये Swiggy One Lite चे सबस्क्रिप्शन देणार आहे.

1. जिओ 866 रिचार्ज प्लान

कंपनीने प्रीपेड योजनांच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन रिचार्ज प्लान अॅड केला आहे. या प्लानची किंमत ८६६ रुपये (Price) इतकी आहे. या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा मिळेल. जिओचा हा प्लान ८४ दिवसांसाठी मिळेल.

तसेच डेटा संपल्यानंतर वापरकर्त्यांना 64kbps च्या वेगाने डेटा मिळेल. या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud मिळेल. हा रिचार्ज प्लान अनलिमिटेड 5G डेटासह येतो. हा रिचार्ज प्लान Jio सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रिप्शन देत नाही. यामध्ये फक्त वापरकर्त्यांना Swiggy One Lite चे तीन महिन्याचे सबस्क्रिप्शन मिळत आहे.

2. Swiggy One Lite फायदे

सबस्क्रिप्शनसाठी वापरकर्त्यांना ६०० रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये १४९ रुपयांपेक्षा अधिकच्या ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी मिळेल. तसेच कंपनी या प्लानमध्ये १० फ्री होम डिलिव्हरी देत आहे. Instamart वरुन १९९ रुपयांच्या ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी देखील मिळणार आहे. या सबस्क्रिप्शन अंतर्गत वापरकर्त्यांना Instamart आणि Swiggy Food या दोन्ही अॅपवर अधिक शुल्क भरावे लागणार नाही. याशिवाय ग्राहकांना ३० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलतही मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT