Jaya Kishori Success Mantra Saam Tv
लाईफस्टाईल

Jaya Kishori : तुम्हीही स्मार्ट वर्कला समजताय शॉर्टकट? वाचा यश प्राप्तीसाठी Success Mantra

Success Mantra : जया किशोरी श्रीमद भागवत कथा आणि नानी बाई का मायरा यांसारख्या कथांच्या लेखिका आहेत. जया किशोरी तिच्या मोटिव्हेशनल स्पीचमुळे जगप्रसिद्ध झाली आहे. तिचे प्रवचन, भजन इ. यूट्यूब आणि सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर खूप शेअर केले जातात.

Shraddha Thik

Jaya Kishori Success Mantra :

जया किशोरी श्रीमद भागवत कथा आणि नानी बाई का मायरा यांसारख्या कथांच्या लेखिका आहेत. जया किशोरी तिच्या मोटिव्हेशनल स्पीचमुळे जगप्रसिद्ध झाली आहे. एक प्रमुख कथाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया किशोरी वयाच्या 9 व्या वर्षापासून लिंगाष्टकम, रामाष्टम, शिव तांडव यांसारख्या अनेक कथा, भजन आणि गाणी गाऊन त्यांच्या भक्तांच्या आवडत्या बनल्या आहेत.

इतकेच नाही तर हे प्रवचन, भजन इ. यूट्यूब आणि सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर खूप शेअर केले जातात. त्यांच्या यशाबद्दल अनेक मंत्र आहेत, जे जाणून तुम्हीही तुमचे करिअर (Career) अधिक उंचीवर नेऊ शकता. जाणून घ्या.

यशाचा मंत्र

जया किशोरीचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. यामध्ये तरुणांची संख्याही मोठी आहे. जे त्यांचे प्रेरणादायी भाषण ऐकतात आणि शेअर देखील करतात. अलीकडेच जया यांनी तिच्या अधिकृत अकाऊंटवरून एक विचार शेअर केला होता. ही कल्पना जीवनात यश मिळविण्याच्या युक्त्या सांगते. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एका कोटमध्ये लिहिले होते की, लोकांनी स्मार्ट (Smart) वर्क आणि शॉर्टकटबद्दल गोंधळून जाऊ नये.

तुम्ही तुमच्या आयुष्यात घालवलेल्या वेळेचा विचार करून वेळ वाया घालवून उपयोग नाही, असे त्यांचे मत आहे. त्यापेक्षा भविष्याचा मार्ग कसा ठरवायचा याचे नियोजन करावे. ती म्हणते की आज पूर्णपणे जग आणि तुम्ही करत असलेल्या कामावर पूर्ण लक्ष द्या.

तुमच्यात कोणतेही गुण नसले तरी एखाद्या विशिष्ट क्षेत्रात तुम्ही मनापासून मेहनत करत असाल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे की नाही हे ओळखावे आणि मगच तुम्ही पुढे जावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT