Hair Care Tips freepik
लाईफस्टाईल

Hair Falls Tips: केस गळती होतेय का? मजबूत करण्यासाठी उपयुक्त घरगुती टिप्स, वाचा सविस्तर

Hair Care Tips: जर केस फारसे गळत असतील तर घरच्या उपायांनी उपचार करा. हे उपाय केसांच्या मुळे मजबूत करून केस गळती कमी करण्यात मदत करतील.

Dhanshri Shintre

उच्च तापमानामुळे जास्त घाम होतो, ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आणि केसांवर अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः केस गळतीचा त्रास मोठ्या प्रमाणावर दिसतो. अनेक लोक या समस्येने त्रस्त असतात. जर तुम्हालाही आर्द्रतेमुळे केस गळतीचा त्रास होत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. येथे आम्ही तुम्हाला काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांनी केस गळणे कमी होऊ शकते आणि केस मजबूत होऊ शकतात.

कांद्याचा रस

पावसाळ्यात केसांसाठी कांद्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो. यासाठी कांदा किसून त्याचा रस नीट काढा आणि नंतर केसांवर लावा, ज्यामुळे केस मजबूत होतील आणि गळती कमी होण्यास मदत होईल. अर्धा तास थांबवल्यानंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून तीनदा हा उपाय वापरल्यास फायदा होतो.

आवळा रस

जर तुमच्याकडे आवळा असेल, तर त्याचा रस काढून कापसाने टाळूवर आणि केसांवर लावा. एका तासानंतर केस धुवा. हा उपाय केसांना मजबूत आणि नैसर्गिक चमक देतो, विशेषतः उन्हाळ्यात.

मेथीचे दाणे

प्रत्येक घरात सहज मिळणाऱ्या मेथीच्या दाण्यांचा वापर करून केस मजबूत करता येतात. रात्रभर भिजवलेली मेथी बारीक करून टाळूवर लावा. अर्धा तास ठेऊन नंतर धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करणे फायदेशीर ठरते.

जर घरगुती उपाय करूनही केस गळणे थांबत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या. दमट आणि उष्ण हवामानात आठवड्यातून २-३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुवा. केस धुण्यासाठी गरम पाणी वापरू नका, हेही लक्षात ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT