IRCTC Uttarakhand Char Dham Yatra Tour: Badrinath Kedarnath in Just 66800 rs Know The Full Package Details in Marathi Saam tv
लाईफस्टाईल

IRCTC Char Dham Package: IRCTC चा देवदर्शन प्लान! फॅमिलीसोबत चारधाम यात्रा करण्याची संधी, इतका येणार खर्च

Badrinath, Kedarnath IRCTC Travel Plan: उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला देवर्दशन करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. आयआरसीटीने प्रवाशांसाठी चारधाम यात्रेचा टूर प्लान आणला आहे.

कोमल दामुद्रे

IRCTC's Uttarakhand Char Dham Yatra's Details:

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला देवर्दशन करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. आयआरसीटीने प्रवाशांसाठी चारधाम यात्रेचा टूर प्लान आणला आहे.

दरवर्षी लाखो भाविक चारधाम यात्रेला जातात. देशातूनच नाही तर परदेशातूनही या ठिकाणी भाविक येतात. आयआरसीटीच्या (IRCTC) या टूर (Tour) पॅकेजमध्ये बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि यमुनोत्रीला भेट देण्याची संधी मिळणार आहे. कसं जायचं? खर्च किती? जाणून घेऊया.

हे पॅकेज मुंबईपासून सुरु होणार आहे. तर हा प्रवास (Travel) मे-जून महिन्यात केला जाणार आहे. या पॅकेजमध्ये पर्यटकांना हॉटेलमध्ये राहणे, विमान तिकीट, खाणेपिणे अधिक सुविधा मिळणार आहे. तसेच यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स, पार्किंग चार्ज आणि टोल टॅक्स यांचाही समावेश असणार आहे.

1. टूर पॅकेज

  • पॅकेजचे नाव – चारधाम यात्रा पॅकेज एक्स-मुंबई (WMA59)

  • डेस्टिनेशन कव्हर – बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि यमुनोत्री

  • कधी जाणार? – ११ मे, १५ मे आणि १८ मे २०२३

  • टूर कालावधी- १२ दिवस/११ रात्री

  • खाण्यापिण्याची सोय - नाश्ता आणि रात्रीचे जेवण

  • प्रवास मोड- फ्लाइट

2. प्रवास कधीपासून सुरु?

आयआरसीटीने जारी केलेल्या टूर पॅकेजमध्ये ११ दिवस आणि १२ रात्रीचा हा प्रवास असणार आहे. हा टूर पॅकेज ११ मे, १८ मे आणि २५ मे पासून सुरु होईल. यामध्ये तुमच्या सोयीनुसार तारीख निवडू शकता. यासाठी तुम्हाला पाटणा विमानतळावरुन विमान प्रवास करता येणार आहे. हरिद्वार ते दिल्ली त्यानंतर हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री मार्गे दिल्लीमार्गे तुम्ही पाटणाला येऊ शकता.

3. खर्च किती?

  • या टूर पॅकेजचे दर तुम्ही निवडलेल्या सीटप्रमाणे असणार आहे. या पॅकेजची सुरुवात ६६,८०० रुपये प्रति व्यक्तीसाठी असणार आहे.

  • सोलो ट्रिपसाठी १,०३,१०० रुपये, दोन व्यक्तींसाठी ७२,६०० रुपये तर तीन व्यक्ती असल्यास ६६,८०० रुपये प्रति व्यक्तीला मोजावे लागणार आहे.

  • तुमच्या सोबत लहान मुले असतील तर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडसाठी ४९,५०० रुपये तर बेडशिवाय ४०,३०० रुपये शुल्क आहे. तर २ ते ४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी २३,३०० रुपये मोजावे लागणार आहे.

4. कसे कराल बुक?

पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT