Shimla Manali Tour, Summer Travel Trip Saam tv
लाईफस्टाईल

Shimla Manali Tour : पर्यटकप्रेमींसाठी IRCTC चा नवा टूर पॅकेज! एप्रिल महिन्यात फिरा शिमला-मनालीला; बुकिंग खर्च पाहा

Summer Travel Trip : आपल्यापैकी अनेकांना प्रवास करायला आवडतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण प्रवास करतात. एप्रिल- मे महिन्यात मुलांना शाळा-कॉलेजला सुट्टी असते. या काळात आपण प्रवासाचे नियोजन करतो.

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Package :

आपल्यापैकी अनेकांना प्रवास करायला आवडतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण प्रवास करतात. एप्रिल- मे महिन्यात मुलांना शाळा-कॉलेजला सुट्टी असते. या काळात आपण प्रवासाचे नियोजन करतो.

जर तुम्हालाही भारतातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे फिरायचे असेल तर IRCTC च्या माध्यमातून या भन्नाट पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. भारतातील काही सुंदर आणि उत्तम ठिकाणे आपल्याला फिरता येतील. जाणून घेऊया या टूर (Tour) पॅकेजबद्दल

1. लेह- लडाख टूर पॅकेज

लेह-लडाखचे हे टूर पॅकेज २७ एप्रिलपासून सुरु होत आहे. हे टूर पॅकेज ६ रात्री ७ दिवसांचे टूर पॅकेज आहे. या टूर पॅकेजसाठी तुम्हाला प्रति व्यक्तीसाठी ५२,४०० रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्हाला कॅम्पमध्ये राहता येईल. या पॅकेजमध्ये हॉटेल, फ्लाइट तिकीट, जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे पाहाता येणार आहे.

2. गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगर टूर पॅकेज

तुम्हाला उन्हाळ्यात फिरायला जायचे असेल तर भारतातील या निसर्गरम्य ठिकाणी जाऊ शकता. हे टूर पॅकेज २० एप्रिलपासून चंदीगड येथून सुरु होणार आहे. ५ रात्री ६ दिवसांचे हे टूर पॅकेज असेल. यामध्ये गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला भेट देण्याची संधी मिळेल. फॅमिली ट्रिपला (Trip) जात असाल तर प्रति व्यक्तीला ३०,८०० रुपये द्यावे लागणार आहे. या ठिकाणी हाऊस बोटला देखील राहण्याची संधी मिळेल.

3. मनाली-शिमला टूर पॅकेज

या पॅकेजसाठी तुम्ही चंदीगडवरुन तिकीट बुक करु शकता. हे टूर पॅकेज ७ रात्री ८ दिवसांच हा टूर पॅकेज आहे. फॅमिली ट्रिपला जाणार असाल तर प्रति व्यक्तीला २४, ११५ रुपये खर्च करावे लागतील. या राउंड ट्रिपमध्ये तिकीट, नाश्ता, जेवण आणि हॉटेलचा खर्च असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT