International Yoga Day 2022, benefits of yoga for health  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

International Yoga Day 2022: जाणून घ्या, योग केल्याने आरोग्याला कसा फायदा होतो

आपल्यापैकी बरेच लोक हे हौशी असतात त्यांना वाटेल तेव्हा व्यायाम किंवा योगासने करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : योगासनाचा विचार आपण फक्त काही काळापर्यंत करतो. आपल्यापैकी बरेच लोक हे हौशी असतात त्यांना वाटेल तेव्हा व्यायाम किंवा योगासने करतात. ते थांबवल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. (benefits of yoga for health)

हे देखील पहा -

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी किंवा शरीर लवचिक बनवण्यासाठी आपण योगासने करु शकतो. योग केल्याने आपला दिवस आनंददायी जातो. योग केल्याने फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्थितीतही बदल होतात. योगासने केल्याने थकवा, चिडचिडेपणा, डोकेदुखी व इतर अनेक आजारांना आळा घालता येतो. योगचे जितके महत्त्व आहे तितकेच त्याचे फायदे देखील आहे. योग केल्याने आरोग्याला त्याचा फायदा (Benefits) कसा होईल हे जाणून घेऊया.

योगाचे आरोग्य फायदे कसे होतात-

१. नियमित योगासने केल्याने आरोग्य सुधारते. मानसिक शक्ती प्रदान होते. शारीरिक शक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते.

२. दररोज काही मिनिटे योगा केल्याने शरीर आणि मन दोन्ही तणावमुक्त होतात. योगासने, प्राणायाम आणि ध्यान हे तणाव दूर करण्यासाठी प्रभावी पद्धती आहेत.

३. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना शांतता आवडते. अशांत मनाला शांत करण्यासाठी योग हा देखील उत्तम मार्ग आहे.

४. शरीरात होणाऱ्या अनियमित घटकांचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि त्याचप्रमाणे मनाची चंचलता किंवा अस्वस्थतेमुळे आपल्याला अनेक आजारांना बळी पडावे लागते. योगासने केल्याने शरीराला मसाज मिळतो आणि स्नायूंना बळकट होण्यास मदत मिळते तर श्वासोच्छवास आणि ध्यानामुळे तणाव कमी होतो आणि प्रतिकारशक्ती सुधारते.

५. थकव्यापासून वाचण्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी आपण योग आणि प्राणायमाची मदत घेऊ शकतो.

६. आपला दिवस ऊर्जावान करण्यासाठी व आपली ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आपण नियमित योगासने करायला हवी.

७. नियमित योगासने केल्याने शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते तसेच योग केल्याने शरीरात लवचिकता निर्माण होऊन आरोग्य सुधारते.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT