लाईफस्टाईल

Indian Armed Force Flag Day 2023 का साजरा केला जातो? कारण काय?

Indian Armed Force Flag Day 2023 : सशस्त्र सेना ध्वज दिन हा प्रत्येक भारताच्या सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हा दिवस ७ डिसेंबर १९४९ पासून दरवर्षी साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Indian Armed Force Flag Day Date :

सशस्त्र सेना ध्वज दिन हा प्रत्येक भारताच्या सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हा दिवस ७ डिसेंबर १९४९ पासून दरवर्षी साजरा केला जातो.

हा दिवस भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी त्या शहीद आणि शूर सैनिकांचा सन्मान केला जातो. ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी शत्रूंशी लढा दिला आणि देशाच्या नावावर सर्वस्व अर्पण केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सशस्त्र सेना ध्वज दिन देशासाठी बलिदान देणाऱ्या अपंग माजी सैनिकांना, शहीद सैनिकांच्या विधवा, शहीदांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी हा दिवस साजरा (Celebrate) केला जातो.

सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच भारतीय सैन्य दल, भारतीय वायू सेना आणि नौसेना यांच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रति आपल्या प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

1. या दिनाचा इतिहास

२८ ऑगस्ट १९४९ मध्ये भारताचे (India) तत्कालीन सरंक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली होती. त्या निर्णया अंतर्गत ध्वज दिन हा ७ डिसेंबर रोजी साजरा करण्याचे ठरवले. नागरिकांमध्ये छोट्या झेंड्यांचे वितरण करुन त्यातून मिळणारा निधी सैनिकांसाठी जमा करणे हा या दिना मागचा मुख्य उद्देश.

या निधीचा वापर देशाचे रक्षण करण्यासाठी धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या आणि मुलांच्या, माजी सैनिकांच्या (Soldier) कल्याणासाठी केला जातो. हे ध्वज तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड आणि केंद्रीय सैनिक बोर्ड या सशस्त्र दलांचे प्रतिक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT