Daily योग:शरीराची लवचिकता वाढते सेतुबंधासन Saam Tv
लाईफस्टाईल

Daily योग:शरीराची लवचिकता वाढते सेतुबंधासन

सेतुबंधासन या आसनाचं नाव सेतू आणि बंध या दोन शब्दांपासून बनला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सेतुबंधासन या आसनाचं नाव सेतू आणि बंध या दोन शब्दांपासून बनला आहे. सेतू म्हणजे पूल आणि बंध म्हणजे बांधणे. हे आसन करताना शरीराची स्थिती ही एका पूलाप्रमाणे होते, म्हणून त्यास सेतुबंधासन असं म्हणतात.

हे देखील पहा -

सेतुबंधासन कसे करावे?

सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना दोन्ही हात जमिनीवरच रहावेत. कमरेचा भाग जितका शक्य होईल तितकाच वर उचलावा. सवयीनुसार आणि शरीराच्या लवचिकतेनुसार त्याची क्षमता वाढवता येईल. या स्थितीत काही सेकंदं थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत यावे. पाठिला दुखापत झाल्यास हे आसन करणं टाळावं.

सेतुबंधासन करण्याचे फायदे

- पाठिचा कणा बळकट होतो.
- शरीराची लवचिकता वाढते.
- पचनाची प्रक्रिया सुलभ होते.
- मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो.
- पाठदुखी, थकवा, अनिद्रा दूर होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: ब्रम्हपुरी विभागात वाळू तस्करांचे थैमान

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT