India diabetes high blood pressure warning saam tv
लाईफस्टाईल

Rising health problems: भारतात येत्या काळात १० पैकी ३ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब त्रास; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

India diabetes high blood pressure warning: आरोग्यतज्ज्ञांनी भारतातील लोकांसाठी गंभीर इशारा दिला आहे. आगामी काही वर्षांत तीनपैकी दहा लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो असं मत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या मागे अनेक आजार लागलेत. यामध्ये कॅन्सर, मधुमेह, डायबेटीज यांसारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे या आजारांमध्ये चांगलीच वाढ होतेय. दक्षिण आशियाच्या लोकसंख्येमध्ये मधुमेह, रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोम या समस्या अनुंवाशिक पद्धतीने असते. त्यामुळे त्या ठिकाणच्या मुलांमध्ये अधिक लठ्ठपणा, कमी वयात मधुमेह आणि हृदयरोग यांची लक्षणं दिसून येतात.

भारतात मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमची स्थिती जगातील इतर भागांपेक्षा अधिक भयावह आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक १० व्यक्तींपैकी ३ व्यक्तींना मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या असणार आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर यावर वेळीच उपाय केले नाहीत तर ही परिस्थिती येत्या काळात अजून धोकादायक असू शकते. यावर जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल, जंकफूडचं सेवन न करणं, जेवणात तेलाचा कमी वापर याशिवाय नियमित व्यायाम आणि रेग्युलर हेल्थ चेकअप हे उपाय आहेत.

मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरची प्रमुख कारणं

अयोग्य आहार

आजकाल कामाच्या वेळा आणि जीवनशैलीमुळे लोकं जेवणाच्या वेळा पाळत नाही. त्याचप्रमाणे आहारात पौष्टिक पदार्थ घेण्याऐवजी साखरयुक्त पदार्थ, जास्त मीठ असलेले पदार्थ तसंच प्रोसेस्ड फूड यांचा समावेश असतो. यामुळे मधुमेह आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतं.

व्यायामाचा अभाव

लोकांच्या बिझी शेड्युलमुळे बैठ्या जीवनशैलीचं प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे लोकं व्यायाम देखील करत नाहीत. व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढतो आणि इतर आजारांच्या प्रमाणात वाढ होते.

ताणतणाव

नोकरी करणाऱ्या किंवा अनेक बिझनेस करणाऱ्या व्यक्तींना ताणतणाव असतो. मानसिक ताणतणावाचा थेट परिणाम ब्लड प्रेशरवर पडतो. तसंच इन्सुलिनवर परिणाम होत असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.

लठ्ठपणा

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाढलेलं वजन उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही समस्याचं प्रमुख कारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Onion Oil: केसांच्या वाढीसाठी कांद्याचं तेल कसे बनवायचे?

Kalyan News : उल्हास नदी वाचवा, ग्रामस्थांकडून निषेधाची होळी; थेट दिला आंदोलनाचा इशारा

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

मुंबईत सराफा दुकानात ६.७९ कोटींची चोरी; ४५ दिवसांत गुन्ह्याचा उलगडा

CISF जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; डोंबिवली परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT