लाईफस्टाईल

Vastu Shastra For Dining Table: डायनिंग टेबलवर 'या' गोष्टी ठेवत असाल तर आजच काढून टाका; नात्यांमध्ये येईल दुरावा

Vastu Shastra For Dining Table: वास्तू शास्त्राच्या नियमांनुसार, घरातील गोष्टी ठेवल्या नाहीत तर त्याचा विपरीत परिणाम कुटुंबातील व्यक्तींवर होऊ शकतो. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे आपण वास्तू शास्त्राला देखील महत्त्व देतो. वास्तू शास्त्रामध्ये घरातील दिशा, गोष्टींची जागा यांच्याबाबत महत्त्वाचे नियम लिहून देण्यात आले आहेत. या नियमांनुसार, घरातील काही गोष्टींची जागा ठरलेली असते. जर या नियमांनुसार, घरातील गोष्टी ठेवल्या नाहीत तर त्याचा विपरीत परिणाम कुटुंबातील व्यक्तींवर होऊ शकतो.

वास्तू तज्ज्ञांच्या मते, घरातील डायनिंग टेबल हे असं ठिकाण आहे जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र जेवतात. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असता कामा नये. डायनिंग टेबलवर चुकीच्या गोष्टी ठेवल्या तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणत्या अशा गोष्टी आहेत, ज्या डायनिंग टेबलवर ठेऊ नयेत हे जाणून घेऊयात.

खाली दिलेल्या गोष्टी डायनिंग टेबलवर ठेऊ नये

चाव्यांचा गुच्छा

घरात प्रवेश केल्यानंतर अनेकांना सवय असते की, चाव्या डायनिंग टेबलवर ठेवणं. मात्र असं कधीही करू नये. चाव्यांना नेहमी एक खास जागा असली पाहिजे. डायनिंग टेबलवर चाव्या ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

औषधं

प्रत्येकाच्या घरात ही औषधं असतातच. जेवणानंतर औषध घेणं लक्षात राहावं यासाठी काहीजण डायनिंग टेबलवर औषधं ठेवतात. मात्र डायनिंग टेबलवर औषधं ठेवणं योग्य बाब नाही. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते.

खोटी प्लॅस्टिकची फळं

डायनिंग टेबलवर चाकू किंवा तीक्ष्ण गोष्टी आपल्याला दिसतात. किंवा काहीजण 'शो'साठी म्हणून खोटी फळं डायनिंग टेबलवर ठेवतात. मात्र अशा गोष्टी जेवणाच्या टेबलवर ठेऊ नये. यामुळे घरातील नात्यांमध्ये कटुता येण्याची शक्यता असते.

पुस्तकं

अनेकांना डायनिंग टेबलावर बसून जेवणासोबत काम करणं किंवा अभ्यास करणं याची सवय असते. मात्र असं करणं वास्तू शास्त्रानुसार, अशुभ मानलं जातं. यामुळे घरामध्या दारिद्य येण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT