Hair care, hair falls tips, Hair loss tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

केस गळतीची समस्या त्रास देतेय तर, हे उपाय करुन पहा

या घरगुती उपायांनी केस गळतीची समस्या रोखा.

कोमल दामुद्रे

मुंबई : केस गळती ही समस्या काही नवीन नाही. बदलते हवामान, तणाव यामुळे देखील केस गळतीची समस्या होऊ लागते. केस गळती रोखण्यासाठी आपण विविध उत्पादने वापरत असतो त्यावर अनेक पैसे खर्च करुन देखील ही समस्या काही कमी होत नाही.

हे देखील पहा -

आपण केसांची निगा राखण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने वापरत असतो. केसांची निगा राखून आपण नियमितपणे केस गळतीवर नियंत्रण आणू शकतो. काही घरगुती पदार्थांचा वापर केल्यास केस गळतीची समस्येवर आपण मात करु शकतो. त्यासाठी या टिप्स फॉलो करा.

१. बीटचा रस केस गळती थांबवण्यास मदत करू शकतो. बीटात जीवनसत्त्व क, ब-६, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि प्रोटीन असते. याचा रस केसांच्या मुळांना लावल्याने केस गळती रोखण्यास मदत होईल.

२. ग्रीन टी चा चोथा केसांच्या वाढीला प्रोत्साहन देते. ग्रीन टी रोज प्यायल्याने केस गळती थांबवण्यासाठी मदत करेल.

३. मेथीमुळे केसांना पोषण तत्व मिळतात. मेथीच्या दाण्याचे पाणी केसांना लावावे व काही वेळाने कोमट पाण्याने केस धुवावे.

४. केस (Hair) गळतीचे नेमके कारण आपल्या शरीरातील जीवनसत्त्व (Vitamins) क ची कमतरता. आवळ्यात जीवनसत्त्व क असते. आवळ्यात जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात आढळते. आवळा खाण्यासोबतच त्याचा रस केसांना लावावा.

५. कडुलिंब हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. केसगळती रोखण्यासाठी मास्क म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. ते बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने उकळवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवा. शॅम्पू केल्यानंतर पेस्ट लावा. काही वेळाने केस धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर करावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT