Relationship Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : पतीच्या या चुकांमुळे पत्नीचा होतो संताप; आजच सुधारा, नंतर होईल पश्चाताप

Husband Wife Relationship Tips : अनेकदा पती आपल्या पत्नीला असे काही बोलतात किंवा काही असं वागतात की पत्नीला याचा फार राग येतो. पत्नीचा मोठा संताप होतो. हाच वाद नंतर विकोपाला जातो. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीमध्ये दरी पडू लागते.

Ruchika Jadhav

पती-पत्नीच्या नात्यात सतत चढ-उतार सुरुच असतात. काही गोष्टींवरून त्यांच्यात वाद होतात. तर लगेचच दोघांमधील भांडणे प्रेमाणे सोडवली देखील जातात. एकाच घरात राहताना पती-पत्नीचे विविध कारणांवरून वाद होतात. यामध्ये अनेकदा पती आपल्या पत्नीला असे काही बोलतात किंवा काही असं वागतात की पत्नीला याचा फार राग येतो. पत्नीचा मोठा संताप होतो. हाच वाद नंतर विकोपाला जातो. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीमध्ये दरी पडू लागते.

आता तुम्हाला तुमचा संसार महत्वाचा असेल तर प्रत्येक पतीने पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण या शुल्लक शुल्लक चुका तुमचा संसार मोडू देखील शकतात.

प्रत्येक कामात आपल्या आईशी तुलना

प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या कॉलीटी असतात. आपल्या वयानुसार व्यक्ती पुढे जातात आणि नवनवीन गोष्टी शिकत असतात. विविध गोष्टी शिकत असताना पती अनेकदा पत्नीची आपल्या आईशी तुलना करतात. हा पदार्थ माझी तुझ्यापेक्षा तर छान बनवते, माझ्या आईला ही सर्व कामे यायची असं म्हणतात. असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. त्याने पत्नीच्या मनात राग आणि संताप निर्माण होतो. त्यामुळे नातं तुटण्याची शक्यता असते.

घरातील कामात मदत न करणे

सध्याच्या युगात पती आणि पत्नी दोघेही घराबाहेर पडतात आणि कामे करतात. काम करताना ऑफिस आणि घर दोन्ही गोष्टी सांभाळणे थोडे कठीण असते. त्यामुळे घर तसेच ऑफिस पती-पत्नी दोघांना मिळून संभाळावे लागते. घरामध्ये आपल्याला अनेक कामे असतात. मात्र अनेक पती आपल्या घरातील एकाही कामाला हात लावत नाहीत. घरात फक्त आराम करतात, टीव्ही पाहतात आणि मजेत आयुष्य जगतात. अशा गोष्टी पत्नीला कधीच आवडत नाहीत. त्यामुळे या सवयी बदलल्या पाहिजेत.

गोष्टींकडे दुर्लक्ष करणे

काही पती पत्नी जेव्हा एखादी गोष्ट सांगत असते बोलत असते तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष करत हम्म... फक्त एवढीच प्रतिक्रिया देतात. असे बोलल्याने पत्नीला या गोष्टींचा फार राग येतो. त्यामुळे पती आपल्याला काहीच महत्व देत नाही असे पत्नीला वाटते. त्यामुळे असे केल्याने प्रत्येक पत्नीला राग येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT