Hair spa tips, Hair care tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

हेअर स्पा करताय तर या गोष्टींची काळजी अवश्य घ्या

बऱ्याचदा केसांची काळजी घेताना आपल्याला वैताग येतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण आपल्या आरोग्याबरोबर इतर गोष्टींची देखील विशेष काळजी घेत असतो. बऱ्याचदा केसांची काळजी घेताना आपल्याला वैताग येतो. (Hair care tips in Marathi)

हे देखील पहा

केस मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण हेअर स्पाची मदत घेतात. केसांना सुंदर बनवण्यासोबतच हेअर स्पा देखील त्यांना निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. आपण पहिल्यांदा हेअर स्पा करत असू तर स्पा करण्यापूर्वी व केल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

१. हेअर स्पा करण्यापूर्वी त्याची योग्य ती माहिती काढा. केसांच्या प्रकाराकडे लक्ष द्या. आपले केस कोरडे आहेत की, तेलकट याची खात्री करा. स्पा करण्यासाठी चांगल्या ब्रँडचे हेअर प्रोडक्ट निवडा

२. सतत हेअर स्पा केल्यास केस कोरडे होऊ शकतात. त्यासाठी महिन्यातून एकदा हेअर स्पा करावा. आपले केस जर कडक व कोरडे असतील तर आपण १५ दिवसांतून एकदा स्पा करायला हवा.

३. हेअर स्पा करण्यापूर्वी किंवा नंतर आपण आपल्या आहारावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अशावेळी खिचडी, दलिया आणि मसूर आणि भात यासारख्या हलके अन्नपदार्थ खाणे. तसेच, लसणाचे अधिक सेवन करा ज्यामुळे आपले रक्त सुरळीत राहिल.

४. स्पा करताना कमीत कमी पाणी प्या. सतत तहान लागत असेल तर आपण ज्युस किंवा ग्रीन टी पिऊ शकतो. स्पा केल्यानंतर अल्कोहोल व धूम्रपान करु नका. सतत घाम येऊन डिहायड्रेशन होईल.

५. हेअर स्पा केसांना (Hair) खूप मऊ आणि मॉइश्चरायझ बनवते. अशावेळी हेअर स्पा केल्यानंतर केसांना तेल (Oil) किंवा हेअर पॅक लावू नका. आपले केस आधीच खूप मॉइश्चराइजर आणि मऊ झाल्यामुळे केस तुटण्याची समस्या होऊ शकते.

६. स्पा केल्यानंतर केस मोकळे सोडू नका. केसांना मास्क किंवा स्कार्फ बांधून ठेवा. बाहेरील प्रदूषणामुळे आपले केस खराब होऊ शकतात. त्यासाठी स्पा केल्यानंतर केसांची काळजी घ्या.

७. स्पा केल्यानंतर केसांना शॅम्पू लावणे टाळा. स्पा नंतर २-३ आठवडे केसांवर कंडिशनर वापरणे आवश्यक आहे. यामुळे केस चमकदार व मऊ होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या ब्युटीशियनशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpari-Chinchwad: पिंपरीत मॅनहोलमध्ये २ कामगारांचा मृत्यू, गेल्या वर्षी इथेच तिघांचा झाला होता मृत्यू

Eating three eggs daily: 30 दिवस दररोज खा 3 अंडी; शरीराला मिळतील चमत्कारीक फायदे

Gold Earrings for Sister: लाडक्या बहिणीसाठी साधे आणि सिंपल सोन्याचे कानातले; रोजच्या वापरासाठी ठरतील एकदम बेस्ट

Maharashtra News Live Update: सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

Gas Cylinder Update : LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३१ ऑगस्टपर्यंत 'हे' एक काम न केल्यास सिलिंडर मिळणार नाही

SCROLL FOR NEXT