Paneer Tikki Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Paneer Tikki Recipe : वीकेंडला ट्राय करा पनीर टिक्की, एकदा चाखाल तर सतत खाल; रेसिपी पाहा

How To Make Paneer Tikki : वीकेंडला आला की, अनेक गृहिणी घरच्यासाठी अनेक नवनवीन पदार्थ ट्राय करतात. चमचमीत पदार्थाची चव चाखण्यासाठी त्या नवीन रेसिपी बनवत असतात. अशातच सगळ्यांना आवडणारे आणि सगळीकडे उपलब्ध असते ते पनीर.

कोमल दामुद्रे

Paneer Tikki :

वीकेंडला आला की, अनेक गृहिणी घरच्यासाठी अनेक नवनवीन पदार्थ ट्राय करतात. चमचमीत पदार्थाची चव चाखण्यासाठी त्या नवीन रेसिपी बनवत असतात. अशातच सगळ्यांना आवडणारे आणि सगळीकडे उपलब्ध असते ते पनीर.

पनीर हे फक्त टेस्टी नाही तर ते आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर आहे. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. कधीकधी पनीरची ग्रेव्ही बनवताना अधिक वेळ लागतो. आतापर्यंत अनेकदा आलू टिक्कीची चव चाखली असेल पण आज आम्ही तुम्हाला पनीरची टिक्की कशी बनवायची याविषयी सांगणार आहोत पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • पनीर - 250 ग्रॅम

  • मीठ - चवीनुसार

  • लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

  • हिरवी मिरची - ३ (बारीक चिरून)

  • जिरे- 1 टीस्पून

  • बेसन - अर्धी वाटी

  • काजू - 1 टीस्पून

  • काळे मीठ - 1 टीस्पून

  • लिंबाचा रस - 1 टीस्पून

  • तूप - १ टीस्पून

2. कृती

  • सर्वात आधी पनीर धुवून किसून घ्या. त्यात लाल तिखट, हिरवी मिरची, काळी मिरी, काजू पावडर आणि सर्व मसाले घालून मिक्स करा.

  • मिश्रण नीट मिक्स केल्यानंतर बेसन आणि तूप घालून टिक्की बनवा.

  • पॅनवर मंद आचेवर तेल गरम करुन घ्या. नंतर टिक्की एक एक करुन तळून घ्या.

  • टिक्की लालसर झाल्यावर आता एका प्लेटमध्ये काढून लाल आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation Problems: पोट साफ न होण्यामागे ही आहेत ५ धोकादायक कारणं; वेळीच व्हा सावध अन्यथा...

हायहोल्टेज ड्रामा! अखेर संख्याबळाचा घोळ सुटला, थलपतीचाच 'विजय'; आज शपथविधी

Maharashtra News Live Update: कांद्याचा भाव एक रुपया कीलो, संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा दिला पेटवून

अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास, मातृभाषेतच 8 टक्के मुलांची दांडी गुल

SCROLL FOR NEXT