How To Make Friends Saam Tv
लाईफस्टाईल

How To Make Friends : नवीन जागी गेलाय ? अनोळखी व्यक्तीशी मैत्री करायची आहे ? 'या' सोप्या टीप्स फॉलो करा

अनोळखी ठिकाणी मैत्री करताय ? या टिप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

How To Make Friends : काही वेळेस शिक्षणांसाठी (Education) किंवा कामाच्या ठिकाणी आपण अनोळखी जागेत किंवा लोकांमध्ये गेलो की, आपल्याला भीती वाटू लागते.

नवीन जागी गेल्यानंतर आपल्याला आपल्या जुन्या मित्रांची आठवण येऊ लागते. त्या ठिकाणी कोणाशीही मैत्री करताना आपल्याला अधिक वेळ लागतो. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात मित्र नावाचा सवंगडी हवा असतो. आपले सुख-दु:ख त्याने वाटून घ्यावे असे आपल्या प्रत्येकाला वाटत असते.

कामानिमित्त किंवा शिक्षणांसाठी आपण परदेशात किंवा दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर मित्र कसे बनवाल हे जाणून घेऊया.

१. हसून आपला प्रतिसाद द्या-

जेव्हा आपण नवीन ठिकाणी जातो त्यावेळी आपण स्वत: आपला परिचय द्यायला हवा. स्वत: ची ओळख करुन देताना आपण हसून समोरच्याशी बोलावे. यामुळे समोरच्यावर आपला प्रभाव चांगला पडतो.

२. ऐकण्यास शिका -

जर आपल्याला समोरच्याशी मैत्री करायची असेल तर आपण त्याचे ऐकून घ्यायला शिकले पाहिजे. आपण नवीन ठिकाणी गेल्यानंतर फक्त स्वत:चे दुसऱ्याला सांगत बसलात आणि त्यांचे बोलणे दुर्लक्ष केल्यास त्यांना या गोष्टीचा राग येऊ शकतो. आपण समोरच्याचे ऐकून घेतल्यास त्याच्या मतांचा व भावनांचा आदर आपण करतो असे त्याला वाटेल व आपली मैत्रीची (Friends) विण गुंफेल.

३. अपशब्द टाळा -

आपण ज्यावेळी आपल्या ओळखीच्या व्यक्तींसोबत असतो. त्यावेळी आपण त्यांना कोणत्याही शब्दांने किंवा त्यांची टिंगल उडवतो पण अशा प्रकारची वर्तणुक आपण अनोळखी ठिकाणी करु नये. आपण अनोळखी ठिकाणी असे काही शब्द वापरतो ज्यामुळे आपल्याशी मैत्री करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यासाठी बोलताना भान ठेवायला हवे.

४. दुसऱ्याची खिल्ली उडवू नका -

काही वेळेस मजाक - मस्तीमध्ये आपण समोरच्याची खिल्ली उडवतो. त्यामुळे त्याला रागही येतो. परंतु, आपण नवीन ठिकाणी गेल्यानंतर मैत्री करत असू तर कोणाचीही खिल्ली उडवू नका. जर तुम्ही कूल दिसण्यासाठी कोणाची खिल्ली उडवत असू तर हे कोणीही आपल्याशी बोलणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT