Amazon Prime Day Sale  Saam Tv
लाईफस्टाईल

Free Amazon Prime Membership: मोफत हवी अमेझॉन प्राइम मेंबरशिप? मग त्वरित करा 'हे' काम

Tricks to Get Free Amazon Prime Membership: मोफत हवी अमेझॉन प्राइम मेंबरशिप? मग त्वरित करा 'हे' काम

साम टिव्ही ब्युरो

Free Amazon Prime Membership: स्वस्त स्मार्टफोन, टीव्ही किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे. Amazon प्राइम डे सेल 15 जुलैपासून सुरू झाली असून ती16 जुलैपर्यंत चालेल.

Amazon या विक्रीदरम्यान अनेक उत्पादनांवर आकर्षक ऑफर देत आहे. ग्राहकांना ICICI आणि SBI बँक कार्ड वापरून 10% पर्यंत सूट मिळू शकेल. यातच तुम्ही Amazon Prime Membership चा मोफत लाभ कसा घेऊ शकता ते आम्ही सांगणार आहोत.

अॅमेझॉन प्राइमचा मोफत लाभ कसा घ्यावा?

तुम्हाला फक्त 30 दिवसांसाठी मोफत प्राइम मेंबरशिप मिळेल. Amazon आपल्या युजर्सला 30 दिवसांसाठी प्राइम मेंबरशिप मोफत वापरण्याची संधी देते. परंतु लक्षात ठेवा की फ्री टेस्ट संपल्यानंतर, तुमच्या बँक खात्यातून आपोआपच 1,499 रुपये आकारले जातात. परंतु तुम्ही वेळेत फ्री टेस्ट बंद केली तर यापासून तुम्ही वाचू शकता आणि तुमचे पैसेही कापले जाणार नाहीत. (Latest Marathi News)

Amazon Prime चा मोफत लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे साइन अप करा..

यासाठी तुम्हाला अमेझॉन पेजवर जावे लागेल. यानंतर प्राइममध्ये सामील होण्यासाठी साइन इन वर क्लिक करा आणि पुढे जा. त्यानंतर Amazon अकाउंटमध्ये लॉग इन करा किंवा नवीन अकाउंट तयार करा.

आता Start your 30-day Prime Free trial वर क्लिक करा. यानंतर पेमेंट पद्धत निवडावी लागेल. ज्यामध्ये डेबिट/क्रेडिट/एटीएम कार्ड आणि UPI समाविष्ट असेल. कार्ड किंवा UPI ची पात्रता जाणून घेण्यासाठी, 2 रुपयांचा परतावा करण्यायोग्य व्यवहार करावा लागेल. यानंतर तुम्हाला 30 दिवसांची मोफत टेस्ट मिळेल. जी 30 दिवसांनंतर 1,499 रुपयांमध्ये ऑटो-रिन्यू होईल. तुम्ही 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच ते रद्द करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT