how to clean a heavily burnt iron tawa at home saam tv
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : काळाकुट्ट तवा होईल चकाचक! मीठ, लिंबू अन् बेकिंग सोड्याची ही ट्रिक एकदा वापरून पाहाच

how to clean a heavily burnt iron tawa at home : वर्षानुवर्षे साचलेला काळाकुट्ट आणि चिकट मळ काढून लोखंडी तवा अगदी नवीनसारखा लख्ख चमकवण्यासाठी काही सोप्या घरगुती ट्रिक्स करुन पहा.

Saam Tv

भारतीय स्वयंपाकघरात लोखंडी तव्याचा वापर दररोज केला जातो. पोळ्या, पराठे, डोसे असे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी तवा उपयोगी पडतो. मात्र, सततच्या वापरामुळे तव्यावर तेल, तूप आणि अन्नाचे जळलेले कण जमा होतात. कालांतराने तव्याच्या कडांना आणि पृष्ठभागावर काळी, चिकट थर तयार होते. ही घाण साध्या साबणाने किंवा स्पंजने सहज निघत नाही. अशा वेळी तवा जास्त घासण्याऐवजी काही सोप्या घरगुती उपायांनी स्वच्छ करता येतो.

मीठ आणि लिंबाने करा स्वच्छता

तव्याच्या कडांना तेल आणि चिकटपणाचा थर जमा झाला असल्यास मीठ आणि लिंबाचा वापर करता येतो. यासाठी तव्यावरील घाण असलेल्या भागावर थोडे मीठ पसरावे. त्यानंतर अर्ध्या लिंबाने त्या भागावर हलक्या हाताने घासावे. मिठाचे दाणे स्क्रबरप्रमाणे काम करतात, तर लिंबामुळे तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. स्वच्छतेनंतर ओल्या कापडाने तवा पुसून घ्यावा.

गरम पाण्याचा करा वापर

तव्यावर अन्नाचे कण किंवा तेल घट्ट चिकटले असल्यास तवा थोडा थंड झाल्यानंतर त्यावर गरम पाणी टाकावे. यामुळे चिकटलेली घाण मऊ होते आणि स्क्रबरच्या मदतीने सहज निघते. मात्र, लोखंडी तवा बराच वेळ पाण्यात भिजत ठेवू नये. त्यामुळे गंज लागण्याची शक्यता असते.

बेकिंग सोड्याची पेस्ट ठरेल उपयोगी

तव्यावर काळे आणि हट्टी डाग असल्यास बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट डाग असलेल्या भागावर लावून काही मिनिटे ठेवावी. त्यानंतर मऊ ब्रश किंवा स्क्रबरने हलक्या हाताने घासावे. यामुळे जमा झालेली घाण आणि तेलकट थर काढण्यास मदत होते.

स्वच्छतेनंतर तवा लगेच वाळवा

लोखंडी तवा स्वच्छ केल्यानंतर त्यावरील पाणी कोरड्या कापडाने पुसून टाकावे. त्यानंतर मंद आचेवर सुमारे एक मिनिट ठेवावा. यामुळे उरलेला ओलावा निघून जातो. तवा पूर्ण कोरडा झाल्यानंतर त्यावर तेलाचे काही थेंब पसरवावेत. यामुळे तव्याचा संरक्षक थर टिकण्यास आणि गंजापासून बचाव करण्यास मदत होते.

लोखंडी तवा स्वच्छ करताना खूप जोरात घासणे किंवा तीव्र रासायनिक क्लीनर वापरणे टाळावे. नियमित स्वच्छता आणि योग्य काळजी घेतल्यास तवा अनेक वर्षे चांगल्या स्थितीत टिकू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यातील येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट; सुनावणीत खळबळ

हिवाळ्यात गाजर खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

Latest Trending Saree Designs: महिलांसाठी पेस्टल रंगाच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स तुम्हालाही आवडतील

Kitchen Sponge Cleaning Tips: भांडी घासण्याचा स्पंज किती दिवस वापरावा? घरातील स्वच्छतेसाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT